विटा बसस्थानक पुर्नबांधणी कामाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते भूमिपूजन.

विटा बसस्थानक पुर्नबांधणी कामाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते भूमिपूजन.

विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार.

सांगली दि. १ : विटा येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.सुमारे १३ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बसस्थानकामध्ये १८ फलाटाची निर्मिती करण्यात येणार असून सर्व बांधकाम हे आरसीसी स्वरूपात करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये उपाहारगृह, दुकानगाळे, संरक्षित भिंत तसेच गेट त्याचबरोबर बसस्थानकाच्या अंतर्गत भागाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या अद्ययावत बसस्थानकाच्या पुनर्बांधणीमुळे लोकांना अत्याधुनिक सोयी, सुविधायुक्त बसस्थानक मिळण्यास मदत होणार आहे.यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजी बापू पाटील,  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माजी जि. प. सदस्य सुहास बाबर, अमोल बाबर,  आनंदराव पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
               
                            

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.