सहसंचालक दिलीप जगदाळे यांना आयएएस संवर्गात बढती.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
पुसेगाव, ता. १६ : बुध (ता. खटाव) येथील दिलीप जगदाळे यांना नुकतीच आयएएस पदावर बढती मिळाली आहे. श्री. जगदाळे हे सध्या महाराष्ट्र शासनाचे शिक्षण सहसंचालक म्हणून कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या मनुष्यबळ व प्रशिक्षण विभागातर्फे नुकतेच या बाबतचे गॅजेट राजपत्र जाहीर करण्यात आले आहे.
यावर्षी महाराष्ट्राच्या राज्य शासकीय नागरी सेवेतील तेवीस अधिकाऱ्यांना आयएएस संवर्गात पदोन्नती देण्यात आलेली आहे. यामध्ये श्री. जगदाळे यांचाही समावेश आहे. जगदाळे यांनी त्यांचे शिक्षण बुध येथील नागनाथ विद्यामंदिर, दापोली व राहुरी कृषी विद्यापीठ , कर्मवीर पाटील मॅनॅजमेण्ट इन्स्टिटयूट सातारा, पुणे विद्यापीठ व सिम्बायोसिस विद्यापीठ येथून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी यापूर्वी श्रीवर्धन व देवगड येथे तहसीलदार पदावर काम केले आहे. सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) व पंढरपूर येथे त्यांनी प्रांताधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी पद त्यानी काही काळ भूषविले आहे. तेथे सर्वसामान्य भाविक व सारकारी यांचे प्राथमिक सोयीसुविधा व मंदिर अंतर्गत व्यवस्था यांचे विकासावर त्यांनी भर दिला होता. अप्पर जिल्हाधिकारी असताना त्यांनी सरदार सरोवर नंदुरबार, धुळे अप्पर जिल्हाधिकारी व बीड जात पडताळणी अध्यक्ष या पदांवर काम केले आहे. नंदुरबार येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व धुळे येथील कोविड काळात जगदाळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
राज्याच्या विविध प्रांतातील ९ जिल्ह्यामध्ये एकूण ३३ वर्षे कामाचा प्रदीर्घ अनुभव त्यांचेकडे आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, शिक्षण संशोधन संचालक राहुल रेखावर, संचालक शरद गोसावी, संपत सूर्यवंशी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment