कार्तिकी एकादशीला पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची नियोजनबद्ध सोय करावी:-सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे.
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची नियोजनबद्ध सोय करावी:-सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा.श्री.जयकुमार गोरे यांनी आज कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय सभागृह पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीच्या नियोजनासाठी आढावा बैठक घेतली.याआढावा बैठकीतील प्रमुख नियोजनाचे निर्देश: कार्तिकी एकादशीच्या काळात पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांसाठी निवास, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्यसेवा, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करण्याबाबत संबंधित सर्व विभागांना निर्देश देण्यात आले. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून तातडीने आवश्यक ती तयारी करावी, असे सांगण्यात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम , युवानेते प्रणव मालक परिचारक, भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, सोलापूर जिल्हा ग्रामीण भाजपा अध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत, भाजपा प्रदेश किसान मोर्चा सचिव माऊली भाऊ हळणवर, शहराध्यक्ष रोहित पानकर,मंडलाध्यक्ष हर्षद कदम यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्तिकी वारीत वारकऱ्यांच्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोयीसाठी रस्त्यांची दुरुस्ती, लाईट व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, महिलांसाठी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच आरोग्यसेवा केंद्रे, तात्पुरते शौचालय आणि तात्पुरत्या निवासस्थानांची उभारणीबाबत नियोजन व आढावा तसेच गोपाळपूर रोडवरील दर्शन पत्राशेड, भक्ती सागर ६५ एकर या ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेऊन श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी संवाद साधला.यावर्षी (२०२५) कार्तिकी एकादशी २ नोव्हेंबर रोजी साजरी होणार असून, शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी ही बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.
Comments
Post a Comment