जनतेचा विश्वास जिंकणे आणि महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेणार:-ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे.

जनतेचा विश्वास जिंकणे आणि महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेणार:-ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे. 

 पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

सातारा येथे भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा  कोअर कमिटी बैठक ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडली. यावेळी त्यांनी बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणूक रणनीती, पक्षसंघटनाची बळकटी,कार्यकर्त्यांची सशस्त्रीकरण, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण चर्चा व निर्णय,भाजपचे उद्दिष्ट स्पष्ट आहे जनतेचा विश्वास जिंकणे आणि महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर ठेवणार असल्याचे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले. 
या बैठकीस खासदार श्रीमंत छत्रपती मा. श्री. उदयनराजे भोसले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ,श्रीमंत छत्रपती ना. श्री.  शिवेंद्रराजे भोसले, भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री श्री. मकरंदजी देशपांडे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर, भारतीय जनता सातारा जिल्हा अध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले, ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर,आ. श्री. मनोजदादा घोरपडे, माजी आमदार श्री. आनंदराव पाटील,माजी जिल्हाध्यक्ष श्री. धैर्यशीलदादा कदम, भाजपा कार्यकारणी सदस्या सौ. प्रियाताई महेश शिंदे, मा. जिल्हा परिषद सदस्य भाजप नेते श्री.अरुण गोरे (आबा), भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस श्री. रामकृष्ण वेताळ, सातारा लोकसभा संयोजक श्री. सुनील काटकर, महिला मोर्चा अध्यक्ष सुरभीताई भोसले, जिल्हा सरचिटणीस विकल्पशेठ शहा, जयकुमार शिंदे, पै. धनंजय काका पाटील (आटकेकर) , सोमनाथ भोसले, विशाल बागल, सुनील बापू शिंदे, संतोष कणसे, सातारा जिल्हा युवामोर्चा अध्यक्ष युवानेते चिन्मयदादा कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्य युवानेते सागर शिवदास, राहुल शिवनामे, प्रवीण शहाणे, विठ्ठल बलशेटवार, सातारा जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.