राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कोरगाव ता. कार्यकर्ता मेळावा सपंन्न.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कोरगाव ता. कार्यकर्ता मेळावा सपंन्न

पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कोरेगाव तालुका कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे साहेब प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार हा सर्वसामान्य जनतेला पटणारा आहे. पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाविषयीची आत्मीयता आपण सर्वांनी पटवून दिली पाहिजे.पक्षाच्या माध्यमातून सुरू असणारे विविध उपक्रम, सर्वसामान्यांच्या प्रश्नाविषयी उठवलेला आवाज आणि महत्त्वाचे प्रश्न अधोरेखित करून आगामी निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. सर्वांनी एकदिलाने काम केल्यावर पक्षाचा निश्चितपणाने प्रत्येक ठिकाणी विजयी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.