मा. मुख्यमंत्री यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुका यादीत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश करावा:-अनिलकुमार कदम.

मा. मुख्यमंत्री यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुका यादीत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश करावा:-अनिलकुमार कदम.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यातील मे ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे संततधार पावसामुळे पिकांचे, फळबागांचे, भाजीपाला, शेतजमीन, विहिरी,पशुधन कुक्कुटपालन, शेळ्या मेंढ्या,गुरांचे गोठे, झोपड्या,पालं, इत्यादी अनेक प्रकारच्या प्रचंड अपरिमित नुकसान झाले आहे.शेतकरी, शेतमजूर, शेळ्या मेंढ्या गुरांचे धनगर समाजातील पशुपालक यांचे आर्थिक नुकसान झाल्याने अतिशय दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.
याबाबत यापूर्वी आपणास ई मेल व्दारे याबाबत सविस्तर माहिती देवून फलटण तालुक्याला अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे बाबत अवगत केले होते.तरी कृपया दिनांक ०९/१०/२०२५ रोजीच्या शासन निर्णय मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुका यादीत खास विशेष बाब म्हणून फलटण तालुक्याचा समावेश करावा हि विनंती.
फलटण तालुक्याचा अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुका यादीत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश करावा अन्यथा नाईलाजाने उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागेल याची कृपया नोंद घ्यावी असे आव्हान श्री अनिलकुमार बुवासाहेब कदम संस्थापक अध्यक्ष एकता क्रांती दल शेतकरी संघटना उध्दव दमयंती निवास गिरवी ता.फलटण जि.सातारा.यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.