फलटणमध्ये डॉ. संपदा मुंडे यांचा मृत्यू; “PM रिपोर्ट बदलण्याचा दबाव” असल्याचा कुटुंबाचा गंभीर आरोप.

फलटणमध्ये डॉ. संपदा मुंडे यांचा मृत्यू; “PM रिपोर्ट बदलण्याचा दबाव” असल्याचा कुटुंबाचा गंभीर आरोप.

फलटण, प्रतिनिधी: राजेंद्र मदने.

फलटण शहरात घडलेली एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. ड्युटी संपल्यावर कोणालाही न सांगता डॉ. संपदा मुंडे यांनी स्थानिक हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुटुंबीयांनी यामागे वरिष्ठांकडून आलेल्या “PM रिपोर्ट बदलण्याच्या” दबावाला जबाबदार धरत गंभीर आरोप केले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, डॉ. मुंडे गेल्या काही दिवसांपासून मानसिक ताणाखाली होत्या. त्यांना सतत वरिष्ठांकडून काही विशिष्ट पोस्टमॉर्टेम (PM) अहवाल बदलण्याबाबत सूचित केल्याचे आणि त्यावरून वारंवार दबाव आणला जात असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या तणावामुळे त्यांनी निराश होऊन हॉटेलमधील खोलीत आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच फलटण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हॉटेलच्या CCTV फूटेजसह, मोबाईल व इतर वैयक्तिक कागदपत्रे तपासली जात आहेत. पोस्टमॉर्टेम अहवाल येईपर्यंत मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.कुटुंबीयांनी मागणी केली आहे की — डॉ. मुंडे यांना सातत्याने मानसिक छळ करण्यात आला. PM रिपोर्ट बदलण्यास नकार दिल्यामुळेच त्यांना लक्ष्य केले गेले. या घटनेची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी व्हावी.
संपूर्ण घटनेने वैद्यकीय क्षेत्रात आणि शासकीय विभागात मोठी खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांकडून येणारा दबाव, प्रशासनातील भीतीचे वातावरण आणि कामाच्या ठिकाणी वाढत चाललेला मानसिक ताण या तिन्ही प्रश्नांकडे आता गंभीरतेने पाहण्याची वेळ आली आहे.सातारा 24 तास न्यूजचे माध्यमातून प्रकरणाची सत्यता समोर आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. संबंधित अधिकाऱ्यांनी न्याय्य आणि पारदर्शक चौकशी करावी, ही मागणी आम्ही समाजाच्या वतीने करतो.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.