Posts

बागल दांपत्य समाजापुढे एक आदर्श ठरेल डॉ .अंबादास कदम.

Image
बागल दांपत्य समाजापुढे एक आदर्श ठरेल  डॉ .अंबादास कदम. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  प्राध्यापक  लतिका बागल यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर अंबादास कदम म्हणाले  बागल दाम्पत्य हे समाजापुढे एक आदर्श ठरेल त्यांनी  छत्तीस वर्ष रयत शिक्षण संस्थेमध्ये सेवा करून आज त्या निवृत्त झाल्या .श्री व सौ बागल दांपत्य यांनी समाजाला फार मोठे आदर्श घालून दिलेले आहेत  35 वर्षांपूर्वी आपल्या समाजाची मानसिकता वेगळ्या पद्धतीची असतानाही फक्त एकाच मुलीवर कुटुंब पूर्ण करून त्याच मुली चे यथोचित संगोपन करून आज एमबीबीएस एमडी पथोलॉजी असे उच्च शिक्षण दिलेले आहे. अशा या बागल दांपत्यांचे यश कीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट पुसेगाव व संजीवनी हॉस्पिटल पुसेगाव यांच्यातर्फे मी अंबादास कदम व संजीवनी कदम आम्ही दोघे त्यांचे स्वागत करतो व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. 

बुध गावचे अंकुश जगदाळे यांना पोलीस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर.

Image
बुध गावचे अंकुश जगदाळे यांना पोलीस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. बुध ता.खटाव येथील राज्य राखीव पोलीस दलामधून हल्लीच सेवानिवृत्त झालेले बुध गावचे रहिवासी श्री. अंकुश ज्ञानदेव जगदाळे यांना यावर्षीचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांचेवतीने नक्षलग्रस्त विभागामध्ये प्रभावी कामगिरीसाठीचे विशेष सेवा पदक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली आणि गोंदिया हा नक्षलग्रस्त भाग म्हणून जाहीर आहे. या जिल्ह्यांमध्ये आपल्या प्राणाची बाजी लावून सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना राजयचे पोलीस महासंचालक श्री. रजनीश सेठ यांनी एका आदेशाद्वारे  विशेष सेवा पदके जाहीर केलेली आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. अंकुश जगदाळे यांनी सेवकाळात अत्यंत काटेकोरपणे व दक्षपणे सेवा केल्याबद्दल त्यांनाही या पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. श्री जगदाळे यांनी भारतीय सैन्य दल व राखीव पोलीस दल यामध्ये एकूण तब्बल ३५ वर्षे सेवा बजावलेली आहे.राखीव पोलीस दलामध्ये काम करीत असताना अठरा वर्षांच्या सेवेत त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक कर्तव्य कठोर,अभ्या...

भक्तांचा पाठीराखा पुस्तकातून सेवागिरी महाराजांच्या विचारांचा प्रसार - मठाधिपती सुंदरगिरी महाराज.

Image
भक्तांचा पाठीराखा पुस्तकातून सेवागिरी महाराजांच्या विचारांचा प्रसार - मठाधिपती सुंदरगिरी महाराज. पुसेगाव: प्रतिनिधी पंकज कदम.       सद्गुरु श्री सेवागिरी महाराज अनेकांचे प्रेरणास्थान आहे. अनेक भक्तांच्या सुखदुःखामध्ये सेवागिरी महाराज आपले आशीर्वाद देत असतात. अशा भक्तांच्या अनुभवाची आपल्या शब्दातून बांधणी करत श्री सेवागिरी महाराजांचे विचार भक्तांचा पाठीराखा या पुस्तकात विशाल सुर्यवंशी यांनी अत्यंत सोप्या भाषेत लिहिले आहे. भक्तांचा पाठीराखा हे पुस्तक समस्त भक्तांसाठी सेवागिरी महाराजांचा प्रसाद आहे असे मत श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मताधिपती सुंदरगिरी महाराज यांनी व्यक्त केले. लेखक विशाल सुर्यवंशी लिखित "भक्तांचा पाठीराखा" या पुस्तकाची पहिली प्रत श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीला अर्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लेखक विशाल सूर्यवंशी, चेअरमन बाळासाहेब जाधव, वेद अभ्यासक शंकर निकम सर, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीरशेठ जाधव, गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित हो यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज म्हणाले महाराजांच्या साक्ष...

महाराष्ट्राच्या कुलदैवत ज्योतिर्लिंग देवास जोतिबावाडी येथील गुरव समाजाकडून 56 भोगाचे ज्योतिर्लिंग देवाला अर्पण.

Image
महाराष्ट्राच्या कुलदैवत ज्योतिर्लिंग देवास जोतिबावाडी येथील गुरव समाजाकडून 56 भोगाचे ज्योतिर्लिंग देवाला अर्पण. पुसेगाव  विशेषप्रतिनिधी पंकज कदम. जोतिबावाडी,रत्नागिरी ता. पन्हाळा. जि. कोल्हापूर येथे श्री ज्योतिर्लिंग अर्थात देव केदारनाथ ब्रह्म ,विष्णू ,महेश या तीनही देवांसह जमदग्नीचा रवांश आणि 12 सूर्याचा तेज यांचा एकत्रित अवतार आहे. अशा स्वरूपामध्ये भगवान विष्णूंचाही समावेश आहे त्यामुळे भगवान नारायणाचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाचा प्रिय असणारी 56 भोगाची सेवा मार्गशीष गुरुवारच्या निमित्ताने श्री केदारनाथ यांना अर्पण करण्यात आले आहे .नाद केदार हे जगाचे पोषक आहेत जगाचे स्वामी आहेत. त्यामुळे विश्वाचा सांभाळ करणाऱ्या या जगन्नाथाप्रति कृतज्ञता म्हणून ही सेवा अर्पण करण्यात येते परमेश्वराला अर्पण करू ते सहस्त्रपटीत भक्तांना परत मिळते,  व नाथ केदारनाथाच्या भक्तांना अखंड अन्नधान्य सुख संपदा प्राप्त व्हावी व याकरता नाथांना ही 56 भोग अर्पण करण्यात येत आहेत, केवळ पोट भरण्यासाठी चे साधन म्हणजे अन्न नव्हे तर कडू ,गोड ,आंबट ,तुरट ,खारट, अशाच नवीन सह भक्ष्य  म्हणजे तोडून...

अॕड सुश्मिता धुमाळ यांची आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी निवड.

Image
अॕड सुश्मिता धुमाळ यांची आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी निवड. कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला  करंजखोप तालुका कोरेगाव येथील ॲड सुश्मिता भालेराव धुमाळ या युवतीने फोरेवर मिस मिसेज टीन 2022 या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊन राष्ट्रीय स्तरावर  बाजी मारली. १७,१८ व १९ डिसेंबर  रोजी जयपुर,राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेमध्ये या  युवतीने विजेती होऊन "Forever Miss India 2022" हा किताब स्वतःच्या नावे केला. ग्रामीण भागातून आलेल्या सुंदरीने Forever Miss India या स्पर्धेत आपले नावलौकिक मिळवल्याने त्यांचे देशभरातून कौतुक होत आहे .जयपुर राजस्थान येथे या संदर्भात देशात सर्वात मोठी असलेली इंटर नॅशनल लेवल ब्युटी पॕजेंट फॉरएवर मिस इंडिया सीजन 2 चे  आयोजन करण्यात आले होते यामध्ये देशभरातून अनेक सुंदर युवतीसह महाराष्ट्रातूनही अनेक युवतींनी आपला सहभाग नोंदवला होता या वेळी ॲड.सुश्मिता धुमाळ यांनी आकर्षक कपडे परिधान करून  रँप वॉकद्वारे व आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रश्नोत्तरांच्या फेरीमध्ये देखील त्या अव्वल स्थानी ठरल्या. सुरूवातीला सातारा जिल्ह्या...

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता शिक्षण संस्था कटिबद्ध - डॉ. सुरेशराव जाधव.

Image
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता शिक्षण संस्था कटिबद्ध - डॉ. सुरेशराव जाधव.        पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.                  शाळेच्या संरक्षण भूमीचे भिंतीचे भूमिपूजन डॉक्टर सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलताना म्हणाले सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावच्या माध्यमातून रणसिंगवाडी ता . खटाव येथील श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सुरू असून ,भविष्यात देखील नेहमीच या विद्यार्थ्यांच्या व हायस्कूलच्या  प्रगतीसाठी संस्था कटिबद्ध राहील असे विचार श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव यांनी व्यक्त केले .श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित ,श्री भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी येथे रणसिंगवाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री अजित रणसिंग यांच्या प्रयत्नातून ,फ्लाय हाय चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या सीएसआर फंडातून शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते .यावेळी अजित रणसिंग यांनी द...

हनुमानगिरी ज्युनियर कॉलेजमध्ये 17 वर्षानंतर भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सर्व शिक्षकांचा केला सत्कार.

Image
हनुमानगिरी ज्युनियर कॉलेजमध्ये 17 वर्षानंतर भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सर्व शिक्षकांचा केला सत्कार. पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम. सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री हनुमानगिरी ज्युनिअर कॉलेज च्या एच एस सी  विज्ञान 2004-05 च्या  बॅच चा  माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेह मेळावा दिनांक 25 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला . यावेळी  17 वर्षा नन्तर पुन्हा एकदा 12 वी  वर्ग भरवण्यात आला , मराठी  केमिस्ट्री फिजिक्स भूगोल इ.  विषया वर लेक्चर्स घेण्यात आली.   इतक्या वर्षा नन्तर उपस्थित सर्व विद्यार्थी विदयार्थीनी  पुन्हा एकदा मन लावून शिकताना दिसत होते.   त्यांनतर काही फनी गेम्स घेण्यात आल्या.  स्नेहमेळाव्यासाठी आलेल्या बुधावले सर भांभुरे सर  पवार सर निर्मळे मॅडम यांचा आकर्षक भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला , विद्यार्थी अमोल मदने सुशांत जाधव महेश पांडेकर आणि विद्यार्थ्यांनी सुप्रिया जाधव , शारदा जाधव , शिल्पा गोडसे , अमृता चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले , सर्व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच...