अखिल भारतीय ग्राहक पंचायत फलटण यांच्या वतीने मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर.
सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत फलटण च्या वतीने विविध प्रश्नांवर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून आज लोकशाही दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा फलटणचा वतीने तहसीलदार फलटण कार्यालयांमध्ये नागरिकांचे विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा पलटण व सर्व खात्यांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक झाली यामध्ये पंचायती कडे आलेल्या अर्जांचा निपटारा करण्यात आला.व प्रलंबित प्रश्नाबाबत संबंधित खात्याला तहसील कार्यालयामार्फत नोटीसा बजावण्यात आल्या. या बैठकीला आरोग्य,परिवहन, बांधकाम, वाहतूक,कृषी, भूमी अभिलेख विभाग प्रमुख उपस्थित होते. तसेच ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष तानाजी सोडमिसे, राजन भोसले जिल्हा सदस्य, मारूती मोहिते तालुका सचिव, कृष्णात कुंभार तालुका सदस्य तसेच तालुका सदस्य उपस्थित होते.अधिकारी स्तरावर अभिजित जाधव तहसील यांचे वतीने सोनवणे साहेब,गुंजवटे साहेब नायब तहसीलदार फलटण, धनंजय कोकरे उपअभियंता उजवा कालवा, सोनवलकर एस एस उप अधीक्षक भूमी अभिलेख फलटण,तेजस पाटील डेप्युटी सी इ ओ नगरपरिषद फलटण, मुकेश अहिवळे आरोग्य निरीक्षक,समीर वाघ R.T.O फलटण,निरज करे,एम के कुंभार मॅडम माहिती अधिकारी तहसिलदार फलटण.वरील सर्व अधिकारी उपस्थित होते.स्वागत सोनावणे साहेब यांनी केले व राजन भोसले यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment