पुसेगाव पोलीस ठाणे अंतर्गत नवरात्री उत्सव व गणराया अवॉर्ड वितरण व बैठकीचे आयोज.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
पुसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुवार दिनांक 18.9.2025 रोजी सायंकाळी पाच वाजता नवरात्र उत्सव निमित्ताने बैठक व गणराया 2025 सर्वोत्कृष्ट गणेश उत्सव अवॉर्ड देण्यात आहे.पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आगामी नवरात्रउत्सव
नियोजनाबद्दल, सुव्यवस्थित, शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सर्व गावातीलसरपंच,उपसरपंच,ग्रामस्थ,सदस्य,
तंटामुक्त अध्यक्ष,पोलीस पाटील, पोलीस मित्र,शांतता कमिटी,दुर्गामाता मंडळाचे पदाधिकारी,अध्यक्ष व कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन सेवागिरी मंगल कार्यालयात केली असून या बैठकीस सर्व पदाधिकाऱ्यांनी हजर राहण्याचे आवाहन पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी केली असून या बैठकीस मार्गदर्शक म्हणून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव अजित टिके. हे अधिकारी मार्गदर्शन करणारा असून या बैठकीस पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व दुर्गामाता मंडळाचे व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी केले आहे.
Comments
Post a Comment