गांजा तस्करी करणारे सराईत गुन्हेगारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.
विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार.
पुसेगाव पोलिसांकडून माहिती अशी साताराबाजूने पुसेगाव कडे येणाऱ्या सराईत गुन्हेगार यांना दिनांक 25 रोजी 8.45 वाजता विसापूर फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली होती. या दरम्यान सातारा बाजूकडून पुसेगाव कडे जाणारी एक्टिवा स्कुटी क्रमांक एम.एच.11 डी.एस 78 93 या स्कुटी वरून गांजा तस्करी करत असताना विनोद गुलाब कदम. समाधान दिलीप खरात. विधान सुनील दास. यांना पुसेगाव पोलिसांनी थांबून त्यांची कसून चौकशी केली असता आरोपी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पुसेगाव पोलीस यांना शंका आल्याने स्कुटीची डिकी खुली करून अधिक तपास केला असता 8 किलो 250 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा पाने फुले व बिज असलेला उग्र वासाचा थोडासा ओलसर असलेला गांजा अंदाजे रक्कम साडेतीन लाख रुपये किमतीचा मिळून आला. या सराईत गुन्हेगारांची नावे पुढील प्रमाणे.1) विनोद गुलाब कदम वय वर्ष 32 राहणार.पांढरवाडी. विसापूर तालुका. खटाव जिल्हा.सातारा 2) समाधान दिलीप खरात वय वर्ष 22 राहणार.मलवडी तालुका.माण जिल्हा. सातारा 3) विधान सुनील दास वय वर्ष 30 राहणार. दुधोरा कॉलनी वॉर्ड नंबर 4 चंपारण बिहार अशी सराईत गुन्हेगारांची नावे असून या मोहिमेमध्ये एक्टिवा स्कुटी साडेतीन लाखाचा गांजा ऐवज पुसेगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन. त्यांना अटक करून कारवाई केली आहे. या विशेष कारवाईने पोलीस अधीक्षक तुषार दोषी. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके. यांनी सपोनी संदीप पोमन व पुसेगाव पोलिसांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment