डॉल्बी आढळून आल्यास जप्त करण्यात येणार:- ए पी आय संदीप पोमण.

डॉल्बी आढळून आल्यास जप्त करण्यात येणार:- ए पी आय संदीप पोमण.

 पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

 पुसेगाव. ता. खटाव पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये  गणेश उत्सव अनुषंगाने सदरचे सन उत्सव शांततेत, सुरळीत व निर्भय वातावरणात पार पाडावेत यासाठी पूर्वतयारी करण्याच्या अनुषंगाने पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांची मीटिंग घेण्यात आली त्यावेळी पुसेगाव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी बोलत असताना साऊंड सिस्टीम बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सदर मीटिंगमध्ये गणेश उत्सव मंडळाने एक गाव एक गणपती , सामाजिक उपक्रम राबवावे, रक्तदान शिबिर आयोजित करावे, गाव स्वच्छता अभियान राबवावे, महिलांचे सन्मान करणारे उपक्रम घ्यावेत. तसेच मा. पोलीस अधीक्षक सातारा यांनी उंच भरारी हा कार्यक्रम घेतलेला असून तो सर्व सामान्य लोकांपर्यंत आपण सर्वांनी पोहोचवा असे आवाहन केले. प्रत्येक गावाने आपल्या गणेश मंडळांना आवाहन करून एक दिवस गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकत्रित येवून गावासाठी स्वच्छ्ता उपक्रम राबवावा, तसेच पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळासाठी  गणराया अवॉर्ड 2024 आयोजन केले असून सर्वांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा. उत्सवा दरम्यान कोणीही धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. गणेशोत्सव काळात लावण्यात येणारे फ्लेक्स होर्डिंग बॅनर यावरती कोणतेही आक्षेपार्य फोटो मजकूर लावण्यात येऊ नयेत, लावण्यात येणारे फ्लेक्स याची संबंधित विभागाकडून परवानगी घेण्यात यावी, मिरवणूक आगमन विसर्जन दरम्यान आक्षेपार्य देखावे ठेवण्यात येऊ नयेत, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा घोषणा, गाणी लावण्यात येऊ नयेत, तसेच गणेशोत्सव अनुषंगाने  सर्व मंडळे यांनी शासनाच्या नियमानुसार ऑनलाइन परवानगी करता अर्ज करावेत  व त्यानंतर  पोलीस स्टेशन मधून परवानगी घ्यावी व आगामी गणेशोत्सव अनुषंगाने गणेश उत्सव मंडळ यांना वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे बाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.