औंध परिसरातील कॉलेजमधील मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमियांची धिंड त्यांच्या गावातून काढली जाणार निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस नाईक सचिन जगताप.

औंध परिसरातील कॉलेजमधील मुलींना त्रास देणाऱ्या रोड  रोमियांची धिंड त्यांच्या गावातून काढली जाणार 
निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस नाईक सचिन जगताप.


पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.


औंध तालुका खटाव येथे निर्भया पथक क्रमांक 5 च्या वतीने राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेजमध्ये विध्यार्थ्यांना व मुलींना स्व-संरक्षण व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी मार्गदर्शनाचे आदेश दिला असून औंध महाविद्यालयांमध्ये निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस नाईक सचिन जगताप यांनी विद्यार्थ्यांना व  विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना महाविद्यालय परिसर किंवा एसटी स्टँड या परिसरामध्ये रोड रोमिओ फिरताना आढळल्यास त्यांची दिंड त्यांच्या गावातून काढली जाईल अशी स्तंभी दिली असून यापुढे कोणत्याही अशा इसमांना दया क्षमा असणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा इशारा देऊन रोड रोमियांनी वेळेतच स्वतःमध्ये सुधारणा करावी  मुलींच्या संरक्षणासाठी आमचे  निर्भया पथक 24 तास सदैव कार्यरत राहणार आहे व प्रत्येक मुलींनी महिलांनी मोबाईल नंबर मध्ये डायल 112 व 1019 हे नंबर सेव्ह करून ठेवावेत या नंबर मुळे निर्भया पथक तुमच्या संकट समई तात्काळ हजर होईल असे यावेळी बोलताना निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस नाईक सचिन जगताप यांनी सांगितले.
तर महिला पोलीस कॉन्स्टेबल राजश्री खाडे यांनी मुला मुलींना महिलांविषयी कायदे,पोक्सो,मोटर वाहन कायदे,मोबाईल वापरताना घ्यावयाची दक्षता, सायबर गुन्हे,या विषयी माहिती दिली.  पथक क्रमांक 5 , मुलींच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असून मुलींनी कोणत्याही प्रकारचा त्रास होत असलेस तात्काळ निर्भया पथकाशी संपर्क साधनेचे आवाहन करणेत आले. {निर्भया पथकाला तुमचा एक कॉल आणि प्रोब्लेम स्वाल }असे आवाहन मुलींना करणेत आले.
कार्यक्रमाला कॉलेजचे उपप्राचार्य गोडसे सर,निकम सर व शिक्षक स्टाफ व निर्भया पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल सागर पोळ, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुमाली घाडगे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.