पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 16 इसम तडीपार.

पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 16  इसम तडीपार.

पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम.

पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गणेश उत्सव तसेच ईद ए मिलाद मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पुसेगाव पोलीस ठाणे कडून कार्यवाही करण्यात आली आहे.सण/उत्सव काळात गुन्हे केलेल्या समाजकंटकांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 163 प्रमाणे 16  इसम यांना गणेशोत्सव/ईद अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीतून हद्दपार/ तडीपार करण्यात आले आहे.ज्यांचेवर चालू वर्षात मारामारी/शासनाने दिले आदेश न जुमानने अशा इसमाचे चांगले वर्तणुकीचे बाँड घेण्यासाठी  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 126 प्रमाणे 30 प्रस्ताव मा.तहसीलदार खटाव यांचेकडे सादर केले आहेत गणेश मंडळाना मिरवणुका कोणतेही वाद न करता सलोख्याचे वातावरणात पार पाडावेत म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 168 प्रमाणे 150 नोटीस बजावण्यात आल्या आहेत.तसेच सर्व गणेश मंडळांना सामाजिक बांधिलकी जपून मिरवणुका वेळेत पार पाडण्याचे आवाहन करून पोलीस ठाणे कडून बंदोबस्तासाठी 2 अधिकारी, 35 पोलीस, 24 होमगार्ड, 1 एस आर पी सेक्शन, 1 स्ट्रायकिंग टीम तसेच डॉल्बी ध्वनीमापक यंत्रणा स्कॉड असे तैनात करण्यात येणार असेलेचे पुसेगाव पोलीस ठाणेचे स. पो. नि .संदीप पोमण यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.