फलटण आगारामध्ये चालक,वाहक आणि कर्मचारी यांचा सेवानिवृत्त सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न.
फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल.
फलटण आगारामध्ये एस टी च्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त सेवानिवृत्त चालक ,वाहक आणि कर्मचारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.आपले संपूर्ण आयुष्य एस टी साठी आणि प्रवाश्यांच्या सेवेसाठी कशाचीही पर्वा न बाळगता फलटण आगारातील अधिकारी रामदास कदम (वाहतूक नियंत्रक),अमृत शिंदे चालक क्र २८९२ , दत्तात्रय निंबाळकर चालक क्र १३०० ,विठ्ठल भिसे चालक क्र १८४२४ ,पंढरीनाथ शेळके चालक क्र ५१३५ ,दत्तात्रय सोनवलकर (सूरक्षा रक्षक) व पूर्वी सेवानिवृत्त झालेले चालक हेमचंद्र भोईटे चालक क्र४३८४ , ज्ञानदेव कोळपे यांनी एस टी च्या आणि प्रवाशांच्या सेवेसाठी घालविले. सेवानिवृत्त सत्कार समारंभा ला प्रामुख्याने पत्रकार अरविंद मेहता, शिवलाल गावडे प्रवासी संघटना अध्यक्ष आगार व्यवस्थापक रोहीत नाईक वाघमोडे ,सुर्यवंशी , धिरज अहिवळे आणि फलटण अगारातील कर्मचारी उपस्थित होते.सुत्रसंचलन माऊली कदम यांनी केले
Comments
Post a Comment