शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव येस ग्रुपच्या करार शेतीच्या करारासाठी मुदतवाढ- येस ग्रुप संस्थापक संजय भगत.
शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव येस ग्रुपच्या करार शेतीच्या करारासाठी मुदतवाढ- येस ग्रुप संस्थापक संजय भगत.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
शेतकऱ्यांना जादाचा दर देऊन ज्यादा चा आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी येस ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या वतीने खरीप हंगाम 2024 साठी करार करणे सुरू होती मात्र शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव करारासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी केले
पुसेगाव येथील येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या ठिकाणी झालेल्या बैठकीत संजय भगत बोलत होते दरवर्षीप्रमाणे खरीप हंगामातील सोयाबीन व घेवडा पिकाचे करार सुरू असून सोयाबीनला 5300 रुपये कमीत कमी दर व घेवड्याला 7000 ते 8000 हजार रुपये कमीत कमी दर देण्यात येणार असून बाजारपेठेतील बाजार भाव वाढले तर त्या वाढीव दराचा फरकही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे या करार शेतीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावत आहे असे ही संजय भगत म्हणाले.दरवर्षी शेतकऱ्यांना कराराप्रमाणे मालाची रक्कम वेळेत बँक खात्यावर जमा करून शेतकऱ्यांचा येस ग्रुपने विश्वास संपादन केला आहे तसेच शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन, बाजारभावापेक्षा जादा दर, चांगल्या उत्पादनाची खात्री वेळेवर मालाची रक्कम मिळणे, 20% उत्पादन खर्च कमी करणे व 20 ते 30 टक्क्यापर्यंत उत्पादन वाढीसाठी येस ग्रुप सभासद शेतकऱ्यांना मदत करत असतो या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे असेही संजय भगत यांनी जाणीवपूर्वक नमूद केले.येस ग्रुप चा चढता आलेख हे प्रगतीचे लक्षण असून शेतकऱ्यांच्या हिताचे आहे खटाव तालुक्या सारख्या दुष्काळी भागात येस ग्रुप शेतकऱ्यांना एक आधारवड म्हणून काम करत आहे शेतकऱ्यांच मनोधैर्य उंचावण्यात येस ग्रुपने मोठी कामगिरी बजावली आहे करार शेती हा शेतकरी आत्महत्या वरचा रामबाण उपाय आहे असे मत कंपनी सचिव अरविंद विधाते यांनी व्यक्त केले.यावेळी बैठकीसाठी कंपनीच्या उपाध्यक्ष सारिकाताई शिंदे , संचालक बाळूताई जगताप, संचालक श्रीकांत लावंड ,प्रतिभा शिंदे, ओंकार भगत उपस्थित होते.सर्वांचे आभार कंपनी व्यवस्थापक विक्रमसिंह शिंदे यांनी मानले.
शेतकऱ्यांना वाढीव आर्थिक लाभ मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ज्यांना सोयाबीन घेवड्याची करार शेती करावयाची असेल त्यांनी 8308790475,8530690475 या नंबर वरती संपर्क करावा असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे
Comments
Post a Comment