पाटण तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा व गती देण्याबाबत मा. शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिल्या सूचना .

पाटण तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा व गती देण्याबाबत मा. शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिल्या सूचना .

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

 सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झालेल्या बैठकीत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी पाटण तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेऊन कामांना गती देण्याच्या सूचना केल्या. पाटण तालुक्यातील रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्यानंतर करावे, अशी सूचना करून मा. ना. शंभूराज देसाई साहेब यावेळी बोलताना बांधकामाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. मातोश्री पाणंद रस्त्यांची चारशेहून अधिक कामे मंजूर आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रत्येक ग्रामसेवकाला तीन ते चार कामे वाटून द्यावीत. कामे वेळेत होण्यासाठी रोहयो व ग्रामपंचायत विभागाने वेळोवेळी आढावा घ्यावा.तसेच यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषदेकडील रस्त्यांचा कामांचा व कोयना भूकंप पुनर्वसन निधी,डोंगरी विकास निधीमधील कामांचाही आढावा घेतला. या बैठकीनंतर मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी जिल्हा परिषद आवारातील लोकल बोर्डाच्या इमारतीच्या आणि पोवई नाका येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या उभारण्यात येत असलेल्या पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. ही कामे दर्जेदार व लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज,  अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रांताधिकारी सुनिल गाढे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.