पुसेगावचे युवा नेते गौरव जाधव मित्र समूह ११११ विद्यार्थ्यांना करणार शैक्षणिक साहित्य वाटप; ५१ मुलांना शिक्षणासाठी घेणार दत्तक.

पुसेगावचे युवा नेते गौरव जाधव मित्र समूह ११११ विद्यार्थ्यांना करणार शैक्षणिक साहित्य वाटप; ५१ मुलांना शिक्षणासाठी घेणार दत्तक.


पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

 पुसेगाव येथील युवा नेते  गौरव जाधव मित्र समूह व श्री सेवागिरी रयत संघटना पुसेगाव आणि पुसेगाव पंचक्रोशीतील ११११ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार असून ५१ मुलांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी दत्तक घेणार आहे. तरी आपल्या पाल्याला कोणत्याही शैक्षणिक मदतीची गरज असल्यास पालकांनी ९६८९६८५०१३, ९७६६५६८२६८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गौरव जाधव मित्र समूहाने केले आहे.
विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके‎ मोफत मिळतात, परंतु त्या व्यतिरिक्त‎ लागणारे इतर शैक्षणिक साहित्य उदा.‎ दप्तर, वही ,पेन, पेन्सिल, कंपास, आदी साहित्य काही विद्यार्थ्यांना त्यांचे‎ पालक देऊ शकत नाहीत. महागाई वाढल्याने सर्वसामान्य कुटुंबातील अनेक पालकांना शैक्षणिक साहित्य खरेदी करताना अडचणी येतात. गतवर्षी पुसेगाव आणि पुसेगाव पंचक्रोशीतील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव यांनी ११११ विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य घरपोच भेट दिले होते. यंदा देखील ‘शाळासोबती’ या उपक्रमाअंतर्गत पुसेगाव आणि पुसेगाव पंचक्रोशीतील पालकांनी एक कॉल करून आपल्या पाल्याला आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्याची नोंद केल्यानंतर नोंदणीनुसार उपक्रमात सहभागी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील ११११ विद्यार्थ्यांना गौरव जाधव मित्र समूहाच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे.


चौकट

शैक्षणिक मदतीच्या माध्यमातून होतकरू व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी प्रयत्नशील असून जसे आपले दातृत्व वाढेल तसे आणखी गरजवंतांपर्यंत पोहचण्याचा मानस आहे.
    श्री गौरव जाधव विश्वस्त श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.