माळशिरस येथील विध्यार्थ्यांचे गोवा येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे स्पर्धेमध्ये घवघवीत यश.
माळशिरस प्रतिनिधी, अमर वाघेला
किंग फायटर कराटे क्लब माळशिरस येथील विद्यार्थ्यांचे गोवा येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे स्पर्धेमध्ये भरघोस यश संपादन केले.शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित अकरावी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा मापसा गोवा येथे पार पडली या स्पर्धेत किंग फायटर कराटे क्लब च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले यामध्ये. आर्यन केंगार सुवर्णपदक, राजवीर वाघेला सुवर्णपदक ,शाहिद गुंडेवाडेकर सुवर्णपदक, कु.खुशी पवार सुवर्णपदक, मंथन भोसले सिल्वर मेडल, धनराज पवार सिल्वर मेडल, यथार्थ गुजरे सिल्वर मेडल, कु. ईश्वरी सिद सिल्वर मेडल, या सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याने माढा मतदारसंघाचे खासदार मा. श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व खेळाडू प्रशिक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थ्यांना मास्टर सुहास सिद सर यांनी अभिनंदन केले मार्गदर्शक प्रशिक्षक सचिन केंगार व विद्या केंगार मॅडम हे लाभले.
Comments
Post a Comment