मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अल्पसंख्यांक विकास परिषद कार्यरत राहणार : अध्यक्ष फिरोजभाई बागवान, कोरेगाव येथे अल्पसंख्यांक विकास परिषदेची पहिली परिषद यशस्वी.

मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अल्पसंख्यांक विकास परिषद कार्यरत राहणार : अध्यक्ष फिरोजभाई बागवान, कोरेगाव येथे अल्पसंख्यांक विकास परिषदेची पहिली परिषद यशस्वी.

कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.


मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अल्पसंख्यांक विकास परिषद कार्यरत राहील. समाज बांधवांचे सर्व प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी पदाधिकारी व सदस्यांशी समन्वय साधून निर्णय घेतले जातील. एकूणच मुस्लिम समाजाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष फिरोजभाई शफिक बागवान यांनी दिली.
कोरेगावच्या मार्केट यार्डमधील गीताई मंगल कार्यालयात अल्पसंख्यांक विकास परिषदेची पहिली परिषद शनिवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू झाली. त्यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी फिरोजभाई शफिक बागवान यांची तर खजिनदारपदी इरफानभाई उर्फ बबलूभाई सलीम जमादार यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर समाज बांधव व परिषदेच्या सदस्यांनी त्यांचा सत्कार केला. त्याला उत्तर देताना बागवान बोलत होते. निवडणूक निर्णय अधिकारी शाहरुख शेख,  परिषदेचे सचिव मोहसीन रमजान कागदी यावेळी उपस्थित होते.
दिवसभर चाललेल्या परिषदेमध्ये मुस्लिम समाजाच्या विकासाच्या अनुषंगाने आणि समाज बांधवांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले. कोरेगाव शहरात आता मुस्लिम वधू वर सूचक समिती स्थापन केली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना देखील कार्यान्वित केली जाणार असून मुस्लिम को ऑपरेशन फंड तयार केला जाणार आहे, तसे ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले. परिषदेस कोरेगाव शहरातील मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.