कोरेगावकर नागरिकांच्यावतीने शनिवारी ना. महेश शिंदे यांचा नागरी सत्कार; विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण.

कोरेगावकर नागरिकांच्यावतीने शनिवारी ना. महेश शिंदे यांचा नागरी सत्कार; विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण.

कोरेगाव प्रतिनिधी. अज्जू मुल्ला.

कोरेगाव शहर तालुका आणि संपूर्ण विधानसभा मतदारसंघासाठी भूषणावह अशा कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देऊन आमदार महेश शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल समस्त कोरेगावकर नागरिकांच्यावतीने शनिवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरासमोर नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी प्रभाग क्रमांक सात, आठ व नऊमधील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण ना. महेश शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे व माजी उपसरपंच तथा विद्यमान नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांनी दिली.ना.महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची सूत्रे हाती घेतल्यापासून कोरेगाव शहराचा पूर्णपणे विकासाभिमुख कायापालट झाला आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात ठोस आणि दर्जेदार विकासकाम झाले असून ट्रीमिक्स काँक्रिटीकरणाद्वारे सर्व रस्ते बनविण्यात आले आहेत. कोरेगावकर नागरिकांनी मोठ्या विश्वासाने ना. महेश शिंदे यांचे नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत नगरपंचायतीची सत्ता देखील कोरेगाव विकास आघाडीकडे सोपविली आहे. एकूणच ना. महेश शिंदे यांनी अल्पावधीत मतदारसंघाचा कायापालट केला असल्याची बाब लक्षात घेऊन महायुती सरकारने त्यांची पश्चिम महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्ती बरोबरच त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देखील बहाल करण्यात आला आहे. ही बाब कोरेगावकर नागरिकांसाठी अत्यंत गौरवाची असून या ऋणातून उतराई होण्यासाठी ना. महेश शिंदे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.शहराचे हृदयस्थान अर्थात हार्ट ऑफ सिटी असलेल्या चौथाई परिसरातील शांतीनगर उपनगरामध्ये गेली अनेक वर्ष रस्त्याचे विषय प्रलंबित होते. मात्र ना. महेश शिंदे यांनी पुढाकार घेऊन रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले असून ते आता ट्रीमिक्स काँक्रिटीकरणाद्वारे नागरिकांच्या सेवेत येणार आहेत. रहिमतपूर रस्त्यावरील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शहर शाखेपासून पूजा नर्सिंग होम ते सागर जयकुमार दोशी यांच्या निवासस्थानापर्यंत नव्याने रस्ता केला जात आहे. त्याचे भूमिपूजन सायंकाळी साडेपाच वाजता ना. महेश शिंदे यांच्या हस्ते, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण संभाजीराव बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, नगराध्यक्ष दिपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिनभैय्या बर्गे, नियोजन समितीच्या सभापती सौ. वनमाला प्रदीप बर्गे, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती सौ. संगीता नितीन ओसवाल, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. शीतल संतोष बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे आजी-माजी नगरसेवक, नगरसेविकांच्या उपस्थितीत होणार आहे.रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर ना. महेश शिंदे यांचे वाजत गाजत मिरवणुकीने श्री भैरवनाथ मंदिर परिसरात आगमन होणार आहे. तेथे ते ग्रामदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर मंदिरासमोर त्यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमास कोरेगाव शहर व परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कोरेगाव विकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.
कोविड योद्धांचाही होणार गौरव
कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात कोरेगाव शहर व परिसरातील नागरिकांसाठी देवदूताप्रमाणे धावून आलेले ना. महेश शिंदे यांच्यासह काडसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. सौ. अरुणाताई विजय बर्गे व डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या कार्याची संपूर्ण राज्यात दखल घेण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे त्यांचा गौरव केला होता. त्याचबरोबर राज्यातील अग्रगण्य पत्रकारांच्या संघटनेने आपल्या वार्षिक अधिवेशनामध्ये पुरस्कार देऊन गौरव केला आहे. डॉ. सौ अरुणाताई विजय बर्गे व डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांचा देखील या कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.