विसापूर येथील शहीद सुभेदार श्रीरंग सावंत यांचे शौर्य चक्र पदक सैन्यदलाच्या बॉम्बे सॅपर्सच्या म्युझियमला सुपूर्द.

विसापूर येथील शहीद  सुभेदार श्रीरंग सावंत  यांचे शौर्य चक्र पदक  सैन्यदलाच्या बॉम्बे सॅपर्सच्या म्युझियमला सुपूर्द.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

विसापूर .ता. खटाव येथील स्व.सुबेदार श्रीरंग तात्याबा सावंत, शौर्य चक्र,  ( 269  ER ) बॉम्बे इंजिनीअर ग्रुप ( पुणे ) मूळ गाव. विसापूर. ता. खटाव. जि. सातारा. यांना भारताच्या राष्ट्रपतीकडुन मानाचे शौर्य चक्र पदक मिळाले होते.  त्यांनी भारतीय सेनेत कार्यरत असताना जिल्हा कोटा राजस्थान येथे जुलै 1986 अतिवृष्टी पाऊस आणि पूरग्रस्त जनतेला वाचवून सुरक्षित स्थळी पोहचवण्यासाठी सैनिकी मदत कार्यात उल्लेखनीय साहस करून देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले.
 भारताच्या राष्ट्रपतीनी त्यांना एप्रिल 1988 मध्ये मरणोपरांत "शौर्य चक्र " बहाल करून गौरव केला. महाराष्ट्र सरकारने मे 1990 मध्ये " त्याना  महाराष्ट्र गौरव पुरस्कार " देऊन सन्मानित केले. 31 जानेवारी रोजी तेच शौर्य चक्र पदक ( मेडल ) भारतीय सेना प्रमुख जनरल मनोज पांडे COAS  आणि  बॉम्बे इंजिनीअर ग्रुप चे कर्नल कमाडंट यांच्याकडे शहीद सुभेदार श्रीरंग सावंत यांचे सुपुत्र डॉ श्री सुधीर सावंत यांनी कायमस्वरूपी सुपूर्द केले आहेे. हा योगायोग संपुर्ण सावंत कुटुंबासाठी आणि विसापुर गावासाठी अभिमानाचा आहे. बॉम्बे इंजिनीअर ग्रुपच्या म्युझिअम मध्ये  त्यांचे कार्य व मेडल गौरवपूर्ण प्रदर्शन केले आहे. स्व.सुबेदार श्रीरंग सावंत संपुर्ण खटाव तालुक्यातील एकमेव शौर्य चक्र सन्मानित शहिद सैनिक आहेत. शहिद सैनिकांच्या स्मरणार्थ साठीचे युद्ध स्मारकाची 100 वर्ष  सोहळा या विशेष कार्यक्रमासाठी जनरल मनोज पांडे साहेब आणि ब्रिगेडियर दिलीप पटवर्धन  उपस्थित होते. तसेच मराठा आणि सिख इंन्फंर्टी बटालियनचे तीन हजार सैनिक, वरिष्ठ अधिकारी, सैनिकांचे परिवार आणि वीर पत्नी , वीर माता ऊपस्थित होते. याप्रसंगी वीर नारींचा जनरल पांडेच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.