रेवलकरवाडी येथे प्राथमिक शाळेच्या बाल बाजारात ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
रेवलकरवाडी. ता .खटाव येथे जिल्हा प्राथमिक शाळेचा बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले यावेळी श्रीमती प्रतिभा भराडे गटशिक्षणअधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश सावंत ,उपसरपंच महादेव लोंढे ,विस्तार अधिकारी संगीता गायकवाड ,विस्तार अधिकारी सोनाली विभुते , शिवाजी जाधव केंद्रप्रमुख, केंद्र समूह जाखणगावचे तानाजी जगदाळे, रेवलकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र गोरे, उपशिक्षक प्रकाश पवार, उपशिक्षक सागर कांबळे, विजय बिटले ,संजीत मोरे ,सचिन फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती तर या बाल बाजाराला विविध मंडळांचे पदाधिकारी, क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती, महिला, पालक यांनी या बाल बाजाराचा आनंद घेत मोठी उत्साहात खरेदी केली या बाजारामध्ये विविध प्रकारच्या भाज्या, फळभाज्या ,विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल विद्यार्थ्यांनी उभे केले होते गावातील सर्व लोकांनी या बाल बाजाराला भेट देऊन भरपूर खरेदीचा आनंद लुटला याबद्दल मुख्याध्यापक श्री हरिचंद्र गोरे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment