k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या परमपूज्य श्री.सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा मौजे पुसेगाव ता.खटाव जि.सातारा येथे दिनांक14/12/2025 रोजीपासून मोठया उत्साहात सुरुआहे.यात्रा शांततेत सुरु असतानाच k M कंपाणीच्या नावाने खटाव भागातील व परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचाअनाधिकृतग्रुप तयार करुन गुन्हे करणारा सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार करण बचाराम मदने वय 21 वर्षे,रा.भवानी टेकखटाव ता.खटाव जि.सातारा यानेदिनांक22/12/2025 रोजी पुसेगाव यात्रेनिमीत्त शासकीयविदयानिकेतन जवळ यात्रा मैदानावर भरवलेल्या श्वान शर्यतीचे ठिकाणी त्याच्याग्रुप मधील गुन्हेगारांना पुसेगावात बोलावून घेतले.करण मदने व त्याचे साथीदार रामदास शंकर जाधव, योगेश युवराज जाधव, वैभव सतिश जाधव सर्व रा.नवलेवाडी पोस्ट मलवडी ता.माण जि.सातारा तसेच शुभम शशिकांत जाधव रा.सिध्देश्वरकुरोली ता.खटावजि.सातारा वगैरे इसमग्रुप तयार करुन पुसेगाव यात्रा मैदानावर श्वानशर्यतठिकाणी आले होते. दिनांक 22/12/2025 रोजीचे दुपारी 3.30 वाजणेचे सुमारास मौजे पुसेगाव ता.खटाव जि.सातारागावी शासकीयविदयानिकेतनच्या ग्राऊंडवर मोटारसायकल वरुन फिर्यादी सुरज बाबुराव जाधव व त्यांचा चुलत भाऊ निखील हणमंत जाधव हे दोघेजण करजांळा रोड वरुन त्यांच्या स्पेअर पार्टचे गॅरेजवर जात असताना करण मदने व त्याच्या साथीदारांनी त्यांची मोटारसायकल सु-याचा व चाकूचा धाक दाखवूनअडवली व त्यांना गाडीवरुन खाली उतरण्यास सांगितले.त्यानंतर करण मदने याने तुमच्या खिशातील पैसे मला काढून दया नाही तर मीतुम्हाला सोडणार नाही असे म्हणाला त्यावर फिर्यादीचा चुलत भाऊ निखील जाधव हा त्यास कसले पैसे दयायचे असे म्हणाला असता. आरोपी यांनी फिर्यादी व साक्षीदार निखील जाधव यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.त्यावेळी आरोपी रामदास शंकर जाधव याने त्याचे हातातील चाकूने निखील जाधव याचे डोक्यात वार करुन गंभीरदुखापत केली.त्यावेळी सूरज जाधव हे त्यांना प्रतिकार करण्यासाठी गेले.असता नमूद गुन्हेगारांनी दोघांनाही खाली पाडून हाताने व लाथाबुक्याने बेदम मारहाण केली.त्या वेळी निखील जाधव यांना करण याच्या साथीदारांनी पकडून ठेवले व करण बचाराम मदने याने निखील जाधव याचे पँटचे डावे खिशातील 10,000/- रुपये रक्कम जबरदस्तीने हिसकावून काढून घेतली व त्याचेतीन साथीदारांनी सूरज जाधव यांना पकडून योगेश युवराज जाधव याने फिर्यादीचे गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून काढून चोरुन नेली.असले बाबत फिर्याद सूरज जाधव यांनी दिली.तक्रारी नुसार पुसेगाव पोलीस स्टेशनला गंभीर मारहाणीसह दरोडा टाकले बाबत गुन्हा नोंद झालेला होता.सदर गुन्हयातील चाकूने वार करणारा आरोपी रामदास जाधव यास पुसेगाव पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने जागीच पकडून अटक केली होती.परंतू करण मदने व त्याचे इतर 4 ते 5 साथीदार गुन्हाकरुन फरार झालेले होते.पुसेगाव पोलीसांकडून फरार आरोपींचा कसोटीने शोध सुरु असतानाच करण मदने यागुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम अशा प्रकारचा गुन्हाकरुन फरार असलेने पुसेगाव व परिसरातील नागरिकांनी त्यास अटक करणे बाबत पुसेगाव पोलीसांना निवेदन दिलेले होते.सदर फरारी आरोपी करण मदने याचा श्री.संदीप पोमण व त्यांचे सहका-यांनी सातारा, सोलापूर जिल्हयात कसून शोध घेतलेला होता.परंतू सदर गुन्हेगार हा सराईतगुन्हेगार असलेने तो मिळून येत नव्हता.पुसेगाव पोलीसांनी तपास कौशल्याचा वापरकरुन व मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन करण मदने यास कराड, मसूर परिसरातून ताब्यात घेतले.व त्याच्या साथीदारांना सिध्देश्वरकुरोली भागातून ताब्यात घेऊन गुन्हयामध्ये अटक करुन त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.करण मदने व त्याच्या साथीदारांना मा.न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीसकस्टडी दिली आहे.
करण बचाराम मदने याने k M कंपनीच्या नावाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचा अनाधिकृत ग्रुप तयार करुन खटाव व माण तालुक्यातील युवकांचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जाळे तयार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नास पुसेगाव पोलीसांनी मोडीत काढले असून अशा प्रकारच्या सराईत गुन्हेगारांना पोलीसांकडून कधीही पाठबळ दिले जाणार नसून वेळीच त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करणार असून पुसेगाव पोलीस ठाणेहददीतील नागरिकांनी भयमुक्त वातावरणात समाजात वावरुन अशागुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचून काढणे कामी पोलीसांना पाठबळ द्यावे व सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन श्री.संदीप पोमण सहाय्यक पोलीस निरीक्षक पुसेगाव पोलीस ठाणे यांनी पुसेगाव पोलीस ठाणेहददीतील नागरिकांना केले आहे.श्री.तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती राजश्री तेरणी उपविभागिय पोलीस अधिकारी, कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.संदीप पोमण, सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले, दीपक बर्गे, पोलीसहवालदार योगेश बागल, पोलीसकाँस्टेबलसंतोष बागल, द-याबानरळे, अविनाशघाडगे, राहूलजाधव,उमेशदेशमुखयांनी सदरचीकारवाई केली आहे. कारवाई पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे श्री.तुषारदोशी पोलीस अधीक्षक वश्रीमतीडॉ.वैशालीकडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदनकेले आहे. 

Comments

Popular posts from this blog

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.