श्री.सेवागिरी महाराज पुण्यस्मरण निमित्त युवा महोत्सवाचे आयोजन.

श्री.सेवागिरी महाराज पुण्यस्मरण निमित्त युवा महोत्सवाचे आयोजन.

 पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.


 प.पू. ची श्री सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त श्री क्षेत्र पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे शनिवार दिनांक 20.12. 2025 रोजी सकाळी9.30 वाजता 12 व्या श्री सेवागिरी खुल्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सातारा जिल्ह्यातील युवक युवती व शोकीकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवागिरी ट्रस्टीमार्फत करण्यात आले आहे.
 या महोत्सवात लोकनृत्य,रेकॉर्ड लोकनृत्य,पथनाट्य  सुगम गायन, समुह गीत  याचे स्पर्धकांनी आयोजन करायचे आहे योग्य त्या विजयी गटाला बक्षीस,प्रमाणपत्र व चषक देण्यात येणारा आहे.या महोत्सवामध्ये नियम व अटी सेवागिरी ट्रस्टीने दिलेल्या नियमानुसार अटी बंधनकारक राहणार आहेत.युवा महोत्सव हे सेवागिरी कृषी प्रदर्शन स्टेज, पुसेगाव या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवामध्ये  भाग घ्यावा.
 प्राध्यापक डॉ.संजय क्षीरसागर सचिव युवा महोत्सव कमिटी 94 23 80 44 61 , प्राध्यापक डॉक्टर अनिल जगताप उपप्राचार्य 94 23 80 44 51,
 जे.बी.जाधव विभागीय प्रमुख 75 88 38 39 96,
 मोहनराव गुरव पर्यवेक्षक हनुमानगिरी हायस्कूल व जुनिअर कॉलेज मोबाईल 94 21 11 70 36, यावरील मोबाईलवर संपर्क साधून युवा महोत्सवामधे सहभाग घेण्याचे आवाहन सेवागिरी ट्रस्टीमार्फत करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.