इंग्रजांना सुळोकी पळो करणाऱ्या क्रांतिकारी गावातून सख्खे भाऊ अथर्व नौदलात तर शंभूराज हवाई दलात बनले अधिकारी.

इंग्रजांना सुळोकी पळो करणाऱ्या क्रांतिकारी गावातून 
 सख्खे भाऊ अथर्व नौदलात तर शंभूराज हवाई दलात बनले अधिकारी.

 पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.


 बुध. तालुका खटाव येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार असलेले प्रकाश प्रल्हादराव  राजेघाटगे यांची अथर्व व शंभूराज ही दोन्ही मुले भारताच्या सैन्य दलात एअरमनपदी रुजू झाल्याने तरुणांसमोर एक वेगळा आदर्श उभा राहिला आहे. एकीकडे उच्च शिक्षण घेऊनही चांगल्या नोकरीच्या शोधात भरकटणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असतानाच बुध गावच्या राजेघाटगे बंधूंनी मात्र आपल्या प्रचंड आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा  व जिद्दीच्या जोरावर आपल्या जीवनाचे स्वप्न अल्पावधीतच प्रत्यक्षात उतरवले आहे. योग्य दिशा, ध्येयनिश्चिती आणि त्यानुसार वाटचाल करण्याचे सातत्य असल्यावर आपल्याला ध्येय हमखास गाठता येतं, याचा वस्तूपाठच या दोन्हीही बंधूनी तरुणांसमोर निर्माण केला आहे.थोरला बंधू असलेला अथर्व प्रकाश घाटगे हा जून 2023 मध्ये भारतीय नौदलात एअरमन म्हणून दाखल झाला. सध्या तो विशाखापट्टणम येथे कर्तव्य बजावत असून त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून शंभुराज प्रकाश राजेघाटगे यानेही इंडियन एअर फोर्समध्ये गगनभरारी घेतली आहे. 9 डिसेंबर 2025 रोजी शंभूराजची इंडियन एअर फोर्स मध्ये एअरमन म्हणून निवड झाली आहे. मे 2025 मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये पात्र ठरल्यानंतर फिजिकल व मेडिकल दोन्ही टप्पे यशस्वीरित्या पार करून डिसेंबर 2025 मध्ये शंभूराज भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाला आहे.खटाव तालुक्याला क्रांतिकारी तर.सैनिकी क्षेत्राची मोठी परंपरा असून या तालुक्यातील बुध या गावात अधिकारी व सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच परंपरेमध्ये राजेघाटगे परिवारातील हे दोन युवक दाखल झाल्याने बुध ग्रामस्थांकडून मोठा आनंद व्यक्त होत आहे.अथर्व व शंभूराज या दोघांचेही इयत्ता चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण बुध गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले असून पाचवी ते सातवीपर्यंतचे  शिक्षण जिल्हा परिषद केंद्रशाळा राजापूर या ठिकाणी झाले आहे.आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण बुध येथील श्री नागनाथ विदया मंदिरात झाले .अथर्व ने बारावी विज्ञान शाखेतून पदविका संपादन केल्यानंतर इंडियन नेव्ही मध्येच जाण्याचा निर्णय पक्का केला. आणि हेच ध्येय निश्चित करून 2023 मध्ये तो नौदलात दाखल देखील झाला. आपल्या भावाचे मार्गदर्शन आई-वडिलांची शिकवण सोबत घेऊन धाकटा मुलगा शंभूराज याने देखील इंडियन एअर फोर्स मध्ये दाखल होण्याचे स्वप्न पाहिलं.  आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण करताच  त्याने अविश्रांत मेहनत घेऊन इंडियन फोर्सच्या अलौकिक यशाला गवसनी घातली.आपल्या आई-वडिलांचा, गुरुजनांचा व मार्गदर्शकांचा विश्वास सार्थ ठरवत या दोन्ही राजेघाटगे बंधूंनी मिळवलेल्या या यशाचे आज समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. फक्त व्यावसायिक शिक्षणाच्या मागे लागून भरमसाठ पैसा शिक्षणावर खर्च करूनच आयुष्यात यशस्वी होता येते असे नाही, तर योग्य वयात योग्य निर्णय घेऊन योग्य क्षेत्र निवडणेही गरजेचे असते. आपल्या वडिलांनी दिलेला हाच उपदेश डोळ्यासमोर ठेवून अथर्व व शंभूराज दोघांनी आपली दिशा निश्चित केली आणि त्यानुसार नियोजनबद्ध अभ्यास करून त्या अनुषंगाने संपूर्ण तयारी करून हे यश त्यांनी मिळवले.त्यांचे कुटुंब हे सामान्य शेतकरी कुटुंब असून वडील प्रकाशराजे हे पत्रकारितेबरोबरच वडिलार्जित शेतीमध्ये काबाडकष्ट करतात तर आई गृहिणी असूनही त्यांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंब चालवते. आपल्या मुलांनी अधिकारी बनावं, एक सुजाण नागरिक बनावं यासाठी त्यांनी मोठे कष्ट वेचले. या कष्टाचे चीज झाल्याने या संपूर्ण राजेघाटगे परिवाराचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक होत आहे.
चौकट 
समाजाला आज अथर्व आणि शंभूराज यांसारख्या जिद्दी मुलांची आवश्यकता असून प्रामाणिक प्रयत्न आणि मेहनत केल्यावर यश नक्कीच मिळते हे त्यांनी दाखवून दिले आहे. दोन्ही बंधूंनी निवडलेला मार्ग हा देशसेवेचा व स्वाभिमानाचा असून या पुढील सेवाकाळात त्यांच्याकडून राष्ट्राची प्रामाणिक सेवा घडावी.
 श्री रणधीरशेठ जाधव , माजी चेअरमन  तथा विश्वस्त श्री. सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव. 
 चौकट 
 बुध या गावाला सैनिकांची व अधिकाऱ्यांची जाज्वल्य परंपरा असून शैक्षणिक दृष्ट्याही हे गाव अत्यंत जागृत आहे. अथर्व व शंभूराज हे दोन्ही नवयुवक   नौदल आणि हवाई दलात अधिकारी बनले ही गावासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. याच आदर्शावर चालणारी नवी पिढी यापुढेही तयार व्हायला हवी.
 सौ . सुजाता बोराटे  सरपंच बुध.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.