पुसेगावमध्ये रस्त्यासाठी कडकडीत बंद ! मुख्य बाजारपेठेतूनच मार्ग हवा ; तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

पुसेगावमध्ये रस्त्यासाठी कडकडीत बंद ! मुख्य बाजारपेठेतूनच मार्ग हवा ; तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

पुसेगांव प्रतिनिधी,पंकज कदम.


पुसेगाव, ता. खटाव येथील प्रस्तावित रस्ता बाह्यवळणाने न नेहता मुख्य बाजारपेठेतूनच जावा, या मागणीसाठी पुसेगाव तालुक्यातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत आंदोलन केले. या आंदोलनाला सर्व पक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली.
मुख्य बाजारपेठेतून रस्ता व्हावा, या मागणीसाठी आतापर्यंत अनेकदा बंद व विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली होती. मात्र, अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याने यावेळी ग्रामस्थ व व्यापारी आक्रमक झाले.
यावेळी उपस्थितांनी “मुख्य बाजारपेठेतूनच रस्ता झाला पाहिजे”, अशी ठाम भूमिका मांडत प्रशासनाच्या संबधित अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. या रस्त्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा निघाला नाही, तर यापुढील काळात आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी दिला.
पुसेगाव पोलीस ठाणयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुसेगाव नागनाथ खुणे यांनी सातारा मुख्यालयातुन पोलीस फौज मागवून चोख बंदोबस्त ठेवला होता. . आंदोलकानी नायब तहसीलदार गायकवाड यांच्यासमोर आपली भूमिका आक्रमकपणे मांडत, “आता केवळ आश्वासन नको, ठोस निर्णय हवा,” अशी जोरदार मागणी केली.
आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन नायब तहसीलदार महेश गायकवाड यांनी माण खटाव प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांच्याशी व खटाव तहसिलदार बाई माने यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. पुसेगाव येथे बंद पाळण्यात आल्याची माहिती देत ग्रामस्थांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्याची विनंती करण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. येत्या दोन दिवसात घेण्यात येणाऱ्या बैठकीतून ठोस तोडगा निघाला नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी दिला आहे.
आता प्रशासनाच्या बैठकीत या रस्त्याच्या प्रश्नावर काय तोडगा निघतो, याकडे पुसेगावसह संपूर्ण सातारा जिल्हयाचे लक्ष वेधले आहे.
   याप्रसंगी उपस्थित असलेल्या नायब तहसिलदार गायकवाड यांना आंदोलकानी रस्त्याबाबत मागणीचे लेखी निवेदन दिले. यावेळी निवेदन देताना प्रताप जाधव ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा अध्यक्ष सातारा ) , गणेश जाधव ( संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वडूज ) , गौरव जाधव ( विश्वस्त सेवागिरी देवस्थान ट्रस्ट ) , सचिन देशमुख ( विश्वस्त सेवागिरी देवस्थान ट्रस्ट ) , श्रीराम जाधव ( अध्यक्ष व्यापारी संघटना पुसेगाव ) , संदीप जाधव ( रयत संघटना अध्यक्ष पुसेगाव शहर ) , सुरेशशेठ जाधव ( आले व्यापारी संघटना जिल्हा अध्यक्ष ) ,  माजी सरपंच बाळासाहेब जाधव , युवा नेते सुसेन जाधव , ऍडव्होकेट रोहित कांबळे , सुश्रूत जाधव व्यापारी , संजय चव्हाण व्यापारी , धिरज जाधव , राजू नदाफ , पोपटभाई शिकलगार , निलेश जाधव , दादाभाई मणेर , सूर्यकांत मसने , संभाजी नलवडे , दिपक तोडकर , सचिन गवळी आदिंसह गावातील प्रमुख कार्यकर्ते व व्यापारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.