महिलांसाठी ‘गौरी गणपती सजावट स्पर्धे’चे आयोजन
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
गणेशोत्सवानिमित्त पुसेगावमध्ये महिलांसाठी ‘गौरी गणपती सजावट स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. श्री सेवागिरी रयत संघटनेच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव व पंचायत समिती सदस्या स्नेहल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेतील प्रथम क्रमांकास फ्रिज, द्वितीय क्रमांकास टीव्ही, तृतीय क्रमांकास वॉशिंग मशीन, चतुर्थ क्रमांकास वॉटर प्युरिफायर आणि पाचव्या क्रमांकास मिक्सर अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. नाव नोंदणीची अंतिम तारीख १३ सप्टेंबर २०२६ असून, पुसेगावातील विविध वॉर्डनिहाय संपर्क क्रमांकांवर नोंदणी करता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.गणेशोत्सवातील महिलांचा सहभाग वाढविणे तसेच पारंपरिक गौरी-गणपती सजावटीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
चौकट :
गौरी-गणपती सजावटीतून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ
गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा महत्त्वाचा सण आहे. गौरी-गणपतीची सजावट करताना महिला आपल्या कल्पकतेतून विविध कलागुण सादर करतात. याच कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘गौरी गणपती सजावट स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. पुसेगावातील अधिकाधिक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली कलात्मकता दाखवावी.
- स्नेहल जाधव, पंचायत समिती सदस्या.
Comments
Post a Comment