सपोनी नागनाथ खुणे यांच्या तत्परतेमुळे मनोरुग्ण पुढील उपचारासाठी यशोधन ट्रस्टीकडे सुपूर्त.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
पुसेगाव ता. खटाव जि.सातारा येथील भवानीनगर परिसरात काही महिन्यांपासून फिरणाऱ्या एका बेवारस आणि निराधार मनोरुग्णाला पुसेगाव पोलिस,व सामाजिक संस्थेच्या मदतीने सुरक्षित आश्रय मिळवून दिला. मागील अनेक दिवसापासून मनोरुग्ण फिरत असल्याची माहिती सपोनी नागनाथ खुणे यांना मिळताच वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली मी तात्काळ आपली टीम रावणा करत सदरच्या व्यक्तीचा शोध घेतला. मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्याची ओळख पटवण्यात अडचण येत होती.त्यामुळे पोलिसांनी 'युवा संकल्प सोशल फाउंडेशन'चे अध्यक्ष योगेश जाधव आणि 'सदिच्छा सोशल फाउंडेशन'चे डॉ. संतोष मोरे यांच्याशी संपर्क साधला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीची स्वच्छता करून त्याला पुसेगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार दिले.यानंतर सातारा पोलीस अधीक्षकांच्या मान्यतेने, या रुग्णाला पुढील उपचारासाठी वाई येथील श्री. रवी बोडके यांच्या 'यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट'मध्ये सुपूर्द करण्यात आले. या संवेदनशील कामगिरीबद्दल पुसेगाव पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment