बिबट्याच्या नावाने अफवा पसरवाल तर थेट जेलची हवा! वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांचा कडक इशारा.

बिबट्याच्या नावाने अफवा पसरवाल तर थेट जेलची हवा! वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांचा कडक इशारा.

फलटण प्रतिनिधी:जुबेर कोतवाल.

सध्या AI च्या माध्यमातून बनावट फोटो तसेच व्हिडिओ करून व्हायरल करण्यात येत आहे फलटण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे की AI किंवा इतर तंत्रज्ञानाचा वापर करून बिबट्या किंवा इतर वन्यप्राण्यांचे बनावट फोटो एडिट करून सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत. तसेच बिबट्याबाबत अफवा पसरवणे, खोटी माहिती प्रसारित करणे किंवा नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या पोस्ट, फोटो अथवा व्हिडिओ शेअर करू नयेत.

वनविभागाच्या माहितीनुसार, अशा प्रकारची कृत्ये भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील संबंधित तरतुदींनुसार प्रतिबंधित असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. संबंधित व्यक्तीस ३ वर्षांपर्यंत कारावास तसेच १ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचा इशारा वनविभागाने दिला आहे.

सोशल मीडियावर काहीही शेअर करण्यापूर्वी सत्यता तपासा !

बिबट्या दिसल्याची किंवा हल्ल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी ती तात्काळ सोशल मीडियावर व्हायरल करण्याऐवजी वनविभागाला माहिती द्यावी असे फलटणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांनी स्पष्ट केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.