फलटण येथे वेफ्लेवर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने फाउंडेशन ची माहिती व प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न.

फलटण येथे वेफ्लेवर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने फाउंडेशन ची माहिती व प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न.

 फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

फलटण येथील फलटण तालुका ग्राम विकास अधिकारी भवन लक्ष्मी नगर येथे सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने फाउंडेशनची माहिती व प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये फाउंडेशनची उद्दिष्टे, कार्यपद्धती, सामाजिक उपक्रम तसेच आगामी काळातील नियोजन याबाबत उपस्थितांना सविस्तर व सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष माननीय श्री. सचिन साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे कार्य फलटण तालुक्यात अधिक जोमाने व प्रभावीपणे करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फलटण तालुका महिला अध्यक्ष, विभाग प्रमुख व केंद्रप्रमुख यांच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
फलटण तालुक्यात फाउंडेशनचे कार्य प्रथमच सुरू होत असल्याने जिल्हाध्यक्ष श्री. सचिन साबळे यांनी उपस्थित महिला व पदाधिकाऱ्यांना फाउंडेशनच्या कार्याची सखोल माहिती देत समाजातील विविध घटकांपर्यंत फाउंडेशनचे कार्य पोहोचविण्याचे आवाहन केले.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय मेजर मनोज कुमार डांगे साहेब यांनी ऑनलाइन माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून सैनिक, शेतकरी, महिला तसेच समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.
सौ. रझिया शेख यांची फलटण तालुका महिला अध्यक्षपदी निवड या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सौ. रझिया शेख यांची सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या फलटण तालुका महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांचे सामाजिक कार्य, नेतृत्वगुण, कार्यकुशलता, महिलांसाठी काम करण्याची तळमळ व समाजसेवेची भावना लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय मेजर मनोज कुमार डांगे, उपाध्यक्ष माननीय श्री. निलेशजी निकम, सातारा जिल्हा महिला अध्यक्ष सौ. प्रतिभाताई पाटील, जिल्हाध्यक्ष श्री. सचिन साबळे, सौ. श्वेता सावळे व श्री. मारुती मोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.तसेच फलटण तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. गणेश दडस, उपाध्यक्ष श्री. अंगराज जाधव, सचिव श्री. गजानन रणवरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नवनिर्वाचित फलटण तालुका महिला अध्यक्षा सौ. रझिया शेख यांनी फाउंडेशनचे फलटण तालुक्यात उत्स्फूर्त स्वागत करत, “फाउंडेशनचे कार्य सर्वांना सोबत घेऊन तालुक्याच्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने काम करू. विभाग प्रमुख व केंद्रप्रमुख यांच्या निवडी करून संघटन अधिक मजबूत करण्यात येईल आणि सैनिक, शेतकरी, महिला व समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले जातील,” असा विश्वास व्यक्त केला.
सौ. रझिया शेख यांनी आपल्यावर विश्वास ठेवून तालुका महिला अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल फाउंडेशनच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमास नवनिर्वाचित तालुका महिला अध्यक्षा सौ. रझिया शेख, सौ. सुकेशनी कांबळे, सौ सुमन पवार प्राचार्य शाहीन शेख  सना श्री कैफ शेख, श्री. मारुती टकले यांच्यासह महिला व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ग्राम विकास अधिकारी भवन उपलब्ध मोफत करून दिल्याबद्दल विशेष आभार
फाउंडेशनचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यासाठी ग्राम विकास अधिकारी भवन उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामसेवक संघटनेचे विशेष आभार मानण्यात आले. उपलब्ध करून दिलेल्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.
फलटण तालुक्यात सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनचे कार्य जोमाने, व्यापक स्वरूपात आणि सर्वांना सोबत घेऊन करण्याचा निर्धार यावेळी सर्व उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, महिला प्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.