उंबरमळे येथे दर बुधवारी आठवडी बाजार सुरु ग्रामस्थांनी याचा फायदा घ्यावा युवा नेते नवनाथ वलेकर.

उंबरमळे येथे दर बुधवारी आठवडी बाजार सुरु ग्रामस्थांनी  याचा फायदा घ्यावा  युवा नेते नवनाथ वलेकर.

 पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

उंबरमळे तालुका खटाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरील पाण्याच्या टाकीजवळ आठवडी बाजाराची  बुधवारी सुरवात झाली. यामुळे येथील व पंचक्रोशी मधील ग्रामस्थांना ताजा भाजीपाला  उपलब्ध होणार आहे. येथील शेतकऱ्यांना जवळची बाजार पेठ उपलब्ध होणार आहे. येथे आठवडी बाजार व्हावा ही येथील शेतकऱ्यांची अनेक वर्ष मागणी होती.सरपंच .संतोष वलेकर यांनी श्रीफळ फोडून उद्घाटन केले.  माजी सरपंच अध्यक्ष खटाव तालुका भाजपा नवनाथ वलेकर, ग्रामपंचायत सदस्य, बाबुराव इनामदार, शिवाजी गोरे, बाबासो लावंड, विठ्ठल पाटोळे, धनाजी पाटोळे, संभाजी वलेकर, विठ्ठल वलेकर, रमेश कदम व पंचक्रोशीतील व्यापारी मंडळी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी या आठवडी बाजाराबद्दल गावातील आणि पंचक्रोशीतील प्रत्येक शेतकरी, व्यापार बांधवांनी यामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन नवनाथ  वलेकर यांनी केले. गावातील वयस्कर लोकांना पुसेगावला जाण्यापेक्षा गावामध्ये बाजार केला खऱ्या अर्थाने त्यांना दिलासा मिळाला असे मत जेष्ठ नागरिक यांनी केले.या बाजारामुळे गावातील जेष्ठ नागरिकापासून ते लहान मुलांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायाला मिळाले. या लहान गावामध्ये पहिल्याच बाजारात चांगली आर्थिक उलाढाल झाली.  यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थाला चालना मिळणार आहे.हा आठवडी बाजार सुरु  करण्यासाठी मुंबईकर-पुणेकर ग्रामस्थ मंडळ यांनी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.