Posts

फलटण शहर व ग्रामीण भागात गौरींचे आगमण व स्वागत.

Image
फलटण शहर व ग्रामीण भागात गौरींचे आगमण व स्वागत. गिरवी प्रतिनिधी, अनिलकुमार कदम. फलटण शहर व ग्रामीण भागातील गिरवी, निरगुडी, दुधेबावी,जावली,गोखळी,बरड,राजूरी,जिंती, साखरवाडी,तरडगांव,आरडगांव, हिंगणगाव, सासवड, आदर्की,बिबी,ढवळ वाखरी दालवडी या संपूर्ण फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात गणेशोत्सव काळात घरोघरी गौरींचे आगमन पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आणि प्रथा संस्कृतीनुसार आज थाटामाटात धार्मिक सांस्कृतिक वातावरणात आगमन व स्वागत केले.आज गौरी आवाहन,पुजन यामध्ये भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून घराघरात इडापिडा जावो आणि बळीचं राज्य येवो!अशी प्रार्थना करतात. सोमवारी गौरी पूजन करतांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून मिष्ठान्न फळं गौरीच्या नैवेद्य सोबत ठेवतात.घरोघरी विद्युत रोषणाई आरास सजावट, रांगोळी पुष्परचना इत्यादी कामांत महिला व्यस्त असतात.विशेषत: गौरी सजावट रांगोळी पुष्परचना विद्युत रोषणाई यामध्ये महिलांच्या मध्ये चढाओढ लागलेली पहायला मिळते.महिला घरोघरी जाऊन गौरी देवदर्शना बरोबर  आरास सजावट रांगोळी पुष्परचना विद्युत रोषणाई यांची पहाणी निरिक्षण करतात.काही ठिकाणी गौरी सजावट ...

८ व्या वेतन आयोगाआधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात होणार ३-४% वाढ.

Image
८ व्या वेतन आयोगाआधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात होणार ३-४% वाढ. गिरवी प्रतिनिधी, अनिलकुमार कदम. गिरवी (अनिलकुमार कदम) केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत चांगली बातमी येत आहे. एका बाजूला कर्मचारी ८व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत असतानाच, आता ७व्या वेतन आयोगांतर्गत त्यांना आणखी एक महागाई भत्ता (DA) वाढ मिळण्याची शक्यता आहे. महागाईच्या सध्याच्या ट्रेंडनुसार, जुलै २०२५ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची दाट शक्यता आहे.ही वाढ सहसा वर्षातून दोनदा, म्हणजेच जानेवारी आणि जुलैपासून लागू केली जाते. यावर्षीची ही वाढ सप्टेंबरच्या शेवटी किंवा दिवाळीच्या आसपास ऑक्टोबरमध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. महागाई भत्त्याची वाढ आणि घोषणा कधी होणार? घोषणा: जुलै महिन्याच्या महागाई भत्त्याची वाढ सहसा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जाहीर केली जाते. गेल्या काही वर्षांचा ट्रेंड पाहता, २०२० आणि २०२१ मध्ये जुलै महिन्याची वाढ ऑक्टोबरमध्ये जाहीर झाली होती. यामुळे यावर्षीही जुलै २०२५ चा DA वाढ सप्टेंबरच्या शेवटी किंवा दिवाळीच्या सुमारास ऑक्टोबरमध्ये ज...

गौरी आगमनाची घराघरात तयारी,महिलांची लगबग भारी.

Image
गौरी आगमनाची घराघरात तयारी,महिलांची लगबग भारी. गिरवी प्रतिनिधी, अनिलकुमार कदम. फलटण तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील गणपती बाप्पा आगमनानंतर आता घराघरात गौरी आगमनाची चाहूल लागली आहे.महिला गौरी आगमनाची तयारी करण्यासाठी घरोघर स्वच्छता साफसफाई डेकोरेशन सजावट करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.फलटण शहर व ग्रामीण भागातील अनेक गावांतून गौरी गणपती सणाच्या निमित्ताने अखंड दिवा विद्युत रोषणाई करण्यात येते.येण सणासुदीला नेहमी प्रमाणे विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.त्यामुळे गौरी गणपती सणाच्या दिवसांत गणपती बाप्पा अंधारात असल्याने भाविकांच्यात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.विद्युत वितरण कंपनीच्या वेळापत्रकानुसार तरी वीजपुरवठा सुरळीत चालू असणे अपेक्षित असताना अचानक घरगुती विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने जनतेच्या मनात तीव्र रोषाची भावना आहे. गौरी आगमनाची तयारी फलटण शहर व ग्रामीण भागात अंतिम टप्प्यात आली आहे.गौरी सजावट करण्यासाठी फलटण शहर व ग्रामीण भागात दरवर्षी परंपरेप्रमाणे श्रध्देने महिला घराघरात तयारी करण्यात व्यस्त आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था प्रभाग रचना जाहीर;आता आरक्षण सोडतीची प्रतिक्षा.

स्थानिक स्वराज्य संस्था प्रभाग रचना जाहीर;आता आरक्षण सोडतीची प्रतिक्षा. सातारा जिल्हा राजकीय वार्तापत्र  श्री अनिलकुमार कदम (मुक्त पत्रकार) महाराष्ट्र राज्यातील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील अंतिम प्रभाग रचना नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत.तथापी आरक्षण सोडत कधी जाहीर होणार याची उत्सुकता व प्रतिक्षा राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी यांना लागली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाव रचना यामध्ये अनेक ठिकाणी पुर्वीच्या प्रभाग रचना व आताची प्रभाग रचना यात बदल झाल्याने प्रस्तावित व विस्थापित राजकीय क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या राजकीय समीकरणाची फेर जुळवणी व गोळाबेरीज करावी लागेल असे सार्वत्रिक चित्र जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दिसून येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना पक्ष फाटा फुटीनंतर  सातारा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील संदर्भ यात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने नविन राजकीय समीकरणे उदयाला येतील अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा...

अयोध्येचा राजा गणेश मंडळाचे प्रबोधनाचे उपक्रम कौतुकास्पद:-अनिलकुमार कदम.

Image
अयोध्येचा राजा गणेश मंडळाचे  प्रबोधनाचे उपक्रम कौतुकास्पद:-अनिलकुमार कदम. गिरवी प्रतिनिधी, अनिलकुमार कदम. फलटण शहरातील गोळीबार मैदान लक्ष्मी नगर मधील अयोध्येचा राजा गणेश मंडळांनी पर्यावरण रक्षण, मनोरंजनात्मक खेळ, रांगोळी प्रदर्शन, चित्रकला, नृत्य, महिलांसाठी संगीत खुर्ची,भजन, महाप्रसाद यासारखे सामाजिक प्रबोधनाचे विविध उपक्रम हे कौतुकास्पद आहेत असे विचार मुक्त पत्रकार लेखक कवी साहित्यिक अनिलकुमार कदम यांनी अयोध्येचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या भेटी प्रसंगी व्यक्त केले.ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण होणार नाही याची काळजी अयोध्येचा राजा गणेशोत्सव मंडळ घेत असून गणेशोत्सवासाठी वर्गणीची कोणालाही सक्ती नाही.हि या गणेशोत्सवात मंडळाची उल्लेखनीय विशेष बाब आहे.अशी माहिती पारस नांदले यांनी दिली.अयोध्येचा राजा गणेशोत्सव मंडळाला कोणी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव वगैरे पदाधिकारी नसतात तर सर्वजण एकत्रितपणे एकदिलाने नियोजन व कामकाज करतात.यामध्ये सर्वजण मिळून मिसळून आनंददायी पध्दतीने गणेशोत्सव साजरा करतात.लहान थोर गणेशभक्त मंडळी आनंदाने सहभागी होतात. साईश वाळा,पारस नांदले,तेजस शिंदे, रोहित तरडे, चेतन ...

षोडश काराण गुण करे हरे चतुर्गती -वास !पाप -पुण्य सब नाशके, ज्ञान-भान परकाश !!

Image
षोडश काराण गुण करे हरे चतुर्गती -वास ! पाप -पुण्य सब नाशके, ज्ञान-भान परकाश !!  फलटण प्रतिनिधी, विशाल घनवट. आगमा मधे सांगितले आहे की पुण्य पाप जन्म मरण या भव फेऱ्यातून मुक्त होऊन जर मोक्ष लक्ष्मीची प्राप्ती करावयाची असेल तर आपणास पूजा, अर्चा ,तीर्थयात्रा ,दान ,धर्म,चौका,मुनि विहार व्यवस्था आधी केले पाहिजे आणि याचा च एक भाग म्हणून जेएसजी संगीनी फोरम फलटण श्री 1008 आदिनाथ मंदिर सुरू असलेल्या 32 दिवसीय षोडशकारण पूजामध्ये सहभागी झाले,दि-20/8/2025 दिन-बुधवार रोजी  सकाळी 6.45 भगवंतांच्या पंचामृत अभिषेकाने या पूजेची सुरुवात झाली यावेळी आचार्य श्री पद्मनंदी गुरुदेव व 8 पिंछी संघ उपस्थित होता, सर्व संगिनी ने अतिशय भक्तिभावाने षडेश कारण पूजेचे नाचत गात टाळ वाजवत, टाळ्या वाजवत भक्तीचा आनंद घेतला, मंदिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पूजेमध्ये सहभागी करून घेतले, आर्यिका 105 धैर्यश्री माताजीने संगिनी फोरम ला खूप खूप आशीर्वाद दिले.अध्यक्ष -मनीषा व्होरा  सचिव- वृषाली गांधी ट्रेझरर- विनश्री दोशी  उपाध्यक्ष ,सहसचिव संचालक एवं सभी संगिनी फलटण.

आज सोनवडी ता. फलटण येथे गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गुरुकृपा एसी फ्लॅटचे भूमिपूजन.

Image
आज सोनवडी ता. फलटण येथे गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गुरुकृपा एसी फ्लॅटचे भूमिपूजन. सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख. फलटण-सोनवडी येथे गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गुरुकृपा एसी फ्लॅटचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर जयकुमार शिंदे साहेब भाजप जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी गुरुकृपा प्लांटच्या चेअरमन सरिता नानासाहेब आडके या यांच्या हस्ते यांच्या भूमिपूजन भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमास माजी झेडपी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर प्लॅटचे मालक नानासाहेब आडके धनंजय मोरे सुरेश चव्हाण उत्तम सोनवलकर साजीद शेख साहिल शेख उपसरपंच भाऊसाहेब मोरे संतोष सोनवलकर माजी सरपंच बाळासाहेब शिंदे हेही हजर होते शेवटी साजिद शेख यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला.