रणरागिणी संस्थेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर उत्साहात संपन्न.

रणरागिणी संस्थेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर उत्साहात संपन्न.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

फलटण, दि. २८ ऑगस्ट २०२६ :
रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने कुरेशी मोहल्ला येथे फलटण उर्दू एज्युकेशन सोसायटी, फलटण संचालित हाजी अब्दुल रज्जाक उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व उर्दू प्राथमिक शाळा, फलटण येथे मोफत नेत्र तपासणी, मोफत ऑपरेशन तसेच अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये शाळेतील सर्व मुला-मुलींची नेत्र तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. नेत्र तपासणीसाठी डॉ. संध्या शिंदे, डॉ. तुकाराम पाटील व डॉ. मोनिका मॅडम यांनी विशेष सेवा दिली.

यावेळी शाळेचे अध्यक्ष इमरान नियाज अहमद कुरेशी, संचालक हाजी नियाज अहमद कुरेशी, सचिव मुक्तार नियाज अहमद कुरेशी, प्राचार्य फर्जना शब्बीर तांबोळी, मुख्याध्यापिका महजबीन लतीफ तांबोळी तसेच शिक्षकवृंद किस्मत पटेल सर, मुस्कान किस्मत पटेल मॅडम, निशांत इनायतुल्ला तांबोळी, प्रिया भीमराव काकडे, उमर फारूक मोमीन, मोहम्मद रफीक शेख आदी उपस्थित होते.

रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने माजी प्राचार्य शहीन शेख, संस्थेच्या अध्यक्षा रझिया शेख, खजिनदार कैफ शेख, सना शेख, इमरान सय्यद व सचिव मारुती टकले उपस्थित होते.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच गरजू नागरिकांना मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशनची सुविधा तसेच अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या या उपक्रमाचे उपस्थित पालक, शिक्षक व नागरिकांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.