बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने प्रा. अमोल बाळासो बंडगर यांना शिक्षण विद्यावाचस्पती मानद पदवी प्रधान.
प्रा. अमोल बाळासो बंडगर यांना शिक्षण विद्यावाचस्पती मानद पदवी प्रधान.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण : रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण व ऑलिंपियाड एक्झामिनेशन कौन्सिल (OEC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात चंद्रशेखर व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय, श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील प्राध्यापक श्री. अमोल बाळासो बंडगर यांना "शिक्षण विद्यावाचस्पती" ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.ऑलिंपियाड एक्झामिनेशन कौन्सिल (OEC) ही 120 देशांतील शिक्षकांचा सहभाग असलेली संस्था असून भारत सरकारच्या मान्यताप्राप्त ऑलिंपियाड परीक्षा परिषदेशी संलग्न आहे. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले योगदान तसेच सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन प्रा. अमोल बाळासो बंडगर यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास ऑलिंपियाड एक्झामिनेशन कौन्सिलच्या कुलपती प्रा. डॉ. आचार्य जगदीश तसेच प्रा. डॉ. स्टीफन रेसलर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने अध्यक्ष सौ. रजिया शेख, खजिनदार कैफ शेख, सचिव श्री. मारुती टकले आणि संचालक श्री. सतीश देसाई यांनी प्रा. बंडगर यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सन्मान सोहळ्यास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्रा. अमोल बाळासो बंडगर यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांनी अशा प्रकारच्या शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रमांद्वारे गुणवंतांचा गौरव करण्याचा संकल्प व्यक्त केला.
Comments
Post a Comment