पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्याभीषण अपघातात दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी;
पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या
भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी;
पुसेगाव/प्रतिनिधी, अकबर भालदार.
वडूज ते पुसेगाव जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या समोर रविवारी (दि. १२ जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली. पुसेगाव बाजूकडून वडूज बाजूकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या स्कूटरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्कूटरवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. अपघात केल्यानंतर अज्ञात चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला आहे.
याप्रबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी संतोष भाऊसाहेब शिंदे (वय ४३, रा. सुभाषनगर, कोरेगाव), त्यांच्या पत्नी सौ. अश्विनी शिंदे आणि मित्र वैभव दिलीप बर्गे (रा. कटापूर रोड, जुनी पेठ, कोरेगाव) हे तिघे रविवारी रात्री १२:४५ वाजण्याच्या सुमारास आपल्या स्कूटी मोटरसायकलवरून (क्रमांक MH 11 DP 1853) जात होते. खटाव गावच्या हद्दीत इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर आले असता, समोरून चुकीच्या बाजूने (Wrong Side) अत्यंत भरधाव वेगात येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या स्कूटीला समोरून जोरदार धडक दिली.
या धडकेत वैभव दिलीप बर्गे (रा. कोरेगाव) याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तसेच फिर्यादी संतोष शिंदे व त्यांच्या पत्नी अश्विनी शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) व मोटर वाहन कायदा कलमांतर्गत गुन्हा (रजि. नं. १६९/२०२६) दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे झालेल्या
नेर फाटा ते ललगुण जाणाऱ्या रस्त्यावर मौजे नागनाथवाडी (ता. खटाव) गावच्या हद्दीत धाडमळा शिवारातील वळणावर मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात एका ५१ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार, दिनांक १२ जुलै रोजी रात्री ९:१० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पुसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विश्वास प्रतापराव नाळे (वय ५१, रा. कोळकी, ता. फलटण, जि. सातारा) हे आपल्या ताब्यातील होंडा कंपनीची सीडी डिलक्स मोटरसायकल (क्रमांक MH 11 AN 2981) वरून नेर फाटा बाजूकडून ललगुण बाजूकडे जात होते. नागनाथवाडी गावच्या हद्दीतील धाडमळा शिवारात रस्त्याला असलेल्या एका धोकादायक वळणावर चालकाचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले आणि गाडी वेगात घसरून खाली पडली. गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याने मृत्यू झाला
मयत चालकाविरुद्धच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) आणि मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा (रजि. नं. १७०/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
या दोन्हीअपघाताचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार आर. व्ही. भोसले व व महिला पोलीस हवालदार जीआर काटकर करीत आहेत.
Comments
Post a Comment