रणरागिणी बहूउदेशीय विकास संस्था फलटण यांच्या वतीने जाधववाडी येथे वृक्षारोपण.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण दि.16 रोजी माऊली फाउंडेशन मुंबई सर्व पदाधिकारी यांनी मोफत वेगवेगळ्या प्रजातीचे वृक्ष देऊन सहकार्य केल्याने रणरागिनी बहुउद्देशीय विकास संस्था फलटण यांनी पर्यावरण संरक्षण जनजागृती कार्य जपत मौजे जाधववाडी ता. फलटण येथे अनेक प्रजातीचे वृक्षरोपण केले. त्याचबरोबर माऊली फाउंडेशन मुंबई या संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक नैसर्गिक बांधीलकी जपत उपस्थित राहून अनमोल असे सहकार्य करून वृक्षारोपण करण्यात आलेने .रणरागिनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आभार देखील मानण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी या संस्थेचे पदाधिकारी सदस्य माऊली फाउंडेशन मुंबईचे पदाधिकारी एडवोकेट टाळकुटे साहेब. एडवोकेट रवींद्र साळुंखे. सौ घडिया मॅडम. अतुलजी. रणरागिनी संस्थेचे संचालक आप्पा साहबु कापसे. सौ रजिया शेख अध्यक्ष. श्री मारुती टकले सचिव त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमास सहभाग घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला.
Comments
Post a Comment