फलटण विश्रामग्रह येथे ह्युमन राईटस फौंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नव्याने ओळखपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात सपंन्न.

फलटण विश्रामग्रह येथे ह्युमन राईटस फौंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नव्याने ओळखपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात सपंन्न.

फलटण | प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

ह्युमन राईटस फौंडेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्रराज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. रणधिरजी भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली 
ह्यूमन राईट फौंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह,फलटण येथे रविवार, दि. ०५ जुलै २०२६ रोजी समितीमध्ये नव्याने कार्यरत झालेल्या पदाधिकारी व सदस्यांचा ओळखपत्र वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मानवाधिकार जनजागृती, संघटन बळकटीकरण आणि सामाजिक बांधिलकी अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी, सदस्य, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह्यूमन राईट फौंडेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय सल्लागार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रणधीरजी भोसलेयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सातारा जिल्हाअध्यक्ष बबनरावजी मदने, जनरल सेक्रेटरी राजेंद्र मदने, सातारा २४ तास न्यूजचे पत्रकार प्रवीण पोपट अहिवळे,  सातारा २४ तास न्यूजचे उपकार्यकारी उपसंपादक /संपर्क प्रमुख तालुका प्रतिनिधी राजेंद्र लालासो मदने यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी मा.बबनराव मदने, आनंदराव भोसले, प्रवीण अहिवळे, राजेंद्र मदने, निशिकांत अहिवळे, संपत गुंजवटे, दिलीप ननावरे, धर्मेंद्र चव्हाण, राणी धर्मेंद्र चव्हाण, हिंदुराव गायकवाड, जनार्दन बेंद्रे, सूर्यकांत काकडे, विशाल घनवट, निलेश बनसोडे, बाळासाहेब धुमाळ, रावसाहेब कदम, रामदास लांगी, प्रमोदजी सस्ते, बाबूराव शिरतोडे, शकील सय्यद, सुमन पोकळे, आशुतोष दडस आणि महावीर व्होरा यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्यांना अधिकृत ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. जे सदस्य कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांची ओळखपत्रे त्यांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आलेली आहेत सदर .
कार्यक्रम माध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही उपस्थिती लावली. दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी तथा सातारा जिल्हा भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष विकास शिंदे, दैनिक सातारा न्यूजचे उपसंपादक राजेंद्र बोंद्रे, साप्ताहिक समर्थ नायकचे संपादक गणेश भोईटे, @प्रगतिचळवळचे संपादक प्रमोदजी सस्ते, सातारा २४ तास न्यूजचे पत्रकार जुबेर कोतवाल, साथी मानवतेचे संपादक शकील सय्यद, साप्ताहिक साम्राज्य नायकचे संपादक हिंदुराव गायकवाड तसेच नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे सर्वानी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटणच्या संस्थापिका-अध्यक्षा रझिया शेख, संस्थेचे सचिव मारुती बाळासाहेब टकले तसेच फलटण, कोरेगाव, माण, मेढा, जावळी, सातारा, बारामती आणि पुरंदर तालुक्यांतील ह्यूमन राईटस फौंडेशन ऑफ इंडियाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील विविध समित्यांतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला जिल्हास्तरीय स्वरूप प्राप्त झाले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मानवाधिकार संरक्षण, नागरिकांचे मूलभूत अधिकार, सामाजिक न्याय, कायद्याचे भान आणि जनजागृतीसाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन सर्वानी अपाआपले मनोगत वेक्त करते वेळी केले. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी समाजातील वंचित, पीडित आणि गरजू घटकांच्या हक्कांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनरल सेक्रेटरी राजेंद्र मदने यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन प्रवीण पोपट अहिवळे यांनी केले. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत, परस्पर संवाद आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा ओळखपत्र वितरण सोहळा अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.