महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री कै.अजिददादा पवार यांच्या स्मरणार्थ रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना वह्या वाटप.
महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री कै.अजिददादा पवार यांच्या स्मरणार्थ रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना वह्या वाटप.
फलटण, प्रतिनिधी :राजेंद्र मदने.
रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.हा उपक्रम श्री दत्त मंदिर (कॉलेज रोड), श्री दुर्गा माता मंदिर (कॉलेज रोड), रंगारी महादेव मंदिर (बारस्कर गल्ली) आणि मरीमाता मंदिर (कॉलेज रोड), फलटण या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात परिसरातील अनेक गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करून संस्थेचे आभार मानले.कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा सौ. रझिया शेख, उपाध्यक्ष श्री. अतुल शहा, सौ. प्रीती शहा, श्री. आप्पा कापसे, सचिव श्री. मारुती टकले, खजिनदार कैफ शेख, मा. प्राचार्या श्रीमती शहीन शेख, तसेच सातारा 24 तास न्यूजचे संपर्कप्रमुख व प्रतिनिधी श्री. राजेंद्र मदने आणि श्री. दुर्गेश फणसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत नियमित अभ्यास करून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था भविष्यातही शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यावरण व सामाजिक विकासासाठी असेच विविध लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबविणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment