इंचगिरी रसाळ संप्रदायाच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान आज वर्धनगड (पाचंगणेआळी) येथे मुक्काम.
पुसेगाव/प्रतिनिधी, अकबर भालदार.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मूळ कोळेवाडी, ता. माण येथील इंचगिरी रसाळ संप्रदायाच्या आषाढी वारी पायी दिंडीचे प्रस्थान हजारो भाविकांच्या व इंचगिरी रसाळ संप्रदायाचे मठाधिपती राजाधिराज पांडुरंग महाराज रसाळ, अध्यक्ष तुकाराम भाऊ रसाळ, भैया महाराज रसाळ यांच्या उपस्थितीत झाले. पादुकांची विधिवत पूजा करून त्या रथामध्ये ठेवण्यात आल्या. दिंडीचे प्रस्थान तरडगाव येथून झाल्यानंतर रविवार, १२ जुलै सातारा करंजे येथे, सोमवार, दि. १३ जुलै शिवरत्न मंगल कार्यालय, कोरेगाव, मंगळवार, दि. १४ जुलै वर्धनगड, पाचंगणे वस्ती रसाळ मंदिर, बुधवार, दि. १५ जुलै निढळ येथील मराठी शाळा, गुरुवार, दि. १६ जुलै जन्मगाव कोळेवाडी, समर्थ मंदिर रसाळ महाराज जन्मभूमी,
दि. शुक्रवार, दि. १७ जुलै पिंगळी बुद्रुक मराठी शाळा, शनिवार, १८ जुलै गोंदवले खुर्द मराठी शाळा, रविवार, दि. १९ जुलै म्हसवड, मराठी शाळा, सोमवार, दि. २० जुलै रोजी ग्रामपंचायत पिलीव सांस्कृतिक भवन, मंगळवार, दि. २१ जुलै खंडोबा मंदिर, तांदुळवाडी, बुधवार, दि. २२ जुलै उपरी मराठी शाळा, गुरुवार, दि. २३ जुलै वाखरी तळ, शुक्रवार, दि. २४ जुलै श्री समर्थ रसाळ महाराज मठ, पंढरपूर या ठिकाणी मुक्काम असणार आहेत.
पायी दिंडी सोहळ्यामध्ये रविवार, दि. १९ जुलै रोज शंकर महाराज रसाळ यांची शुद्ध षष्ठी असल्याने पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांच्या न्यू माणदेश पत्रा डेपो, दिवड येथे सकाळी ११ वाजता पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होईल तर शुक्रवार, दि.
१७ जुलै रोजी सकाळी कोळेवाडी येथे लोटांगणाचा कार्यक्रम होईल. या पायी दिंडी सोहळ्यासाठी वाहन सेवा अथर्व तुकाराम रसाळ, रामचंद्र गायकवाड संतोष चव्हाण यांच्यासह १५ जणांनी दिली असून अश्वसेवा लखन सजगणे, पिंगळी बुद्रुक, बाळासाहेब पगडे, देवाची आळंदी, संतोष करे ढवळ, यांची असून पालखी रथासाठी शांताराम काटे यांच्या स्मरणार्थ पोपटराव हरिभाऊ काटे यांची मानाची बैल जोडी असून चरोली बुद्रुक, आळंदी देवाची व शंकर गडदे, गणेश ताटे यांची बैलजोडी असणार आहे. या दिंडी सोहळ्यानिमित्त पहाटे काकडा, भजन, हरिपाठ, आठ ते दहा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रमाचा आस्वाद जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन इंचगिरी रसाळ संप्रदायाचे अध्यक्ष तुकाराम रसाळ व भैया रसाळ यांनी केले आहे.
Comments
Post a Comment