श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी सोहळ्यानिमित्त रणरागिणी संस्थेतर्फे पाणी व खाऊ वाटप.



श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी सोहळ्यानिमित्त रणरागिणी संस्थेतर्फे पाणी व खाऊ वाटप.

फलटण प्रतिनिधी,राजेंद्र मदने.

फलटण, दि. 17 जुलै 2026 :रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी सोहळ्यानिमित्त नाना पाटील चौक, फलटण येथे वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
या सेवाभावी उपक्रमाला वारकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सेवा देत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रझिया शेख, उपाध्यक्ष श्री. अतुल शहा, सौ. प्रीती शहा, डॉ. सौ. श्रुती थिटे, श्री. अप्पासो सायबू कापसे, संचालक माननीय माजी प्राचार्या श्रीमती शाहीन शेख, खजिनदार श्री. कैफ शेख, श्री इमरान सय्यद सचिव श्री. मारुती टकले, सौ. सना शेख, सौ. अनिसा सय्यद सौ हिना सय्यद तसेच संस्थेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.