डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी स्वराज चव्हाण याला कराटेमध्ये 'सेकंड ब्लॅक बेल्ट'

डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी स्वराज चव्हाण याला कराटेमध्ये 'सेकंड ब्लॅक बेल्ट'

पुसेगाव/प्रतिनिधी, अकबर भालदार.

श्री. सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ, पुसेगाव संचलित **डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल**मधील इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेला हुशार व प्रगतीशील विद्यार्थी विघ्नहर्ता इस्टेटचे संस्थापक संचालक गजानन चव्हाण यांचे चिरंजीव **स्वराज गजानन चव्हाण** याने कराटे क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन केले आहे. स्वराजने कराटेमध्ये अत्यंत मानाचा व कठीण समजला जाणारा 'सेकंड ब्लॅक बेल्ट'(Second Black Belt) यशस्वीरीत्या प्राप्त केला असून, या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल आणि पुसेगाव परिसराच्या वैभवात मोलाची भर पडली आहे. शाळेमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात स्वराजचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

स्वराज चव्हाण याने मिळवलेल्या या यशाबद्दल खालील मान्यवरांनी व ग्रामस्थांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत:

श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ, पुसेगाव संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सर्व संस्था संचालक.
शालेय प्रशासन गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी, डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक.
शिक्षक व पालक वर्ग शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व सजग पालक आणि पुसेगावचे ग्रामस्थ.

स्वराजने अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रात मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.