सकल धनगर समाज यांचे वतीने फलटण तहसीलदार साहेब यांना निवेदन.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला एस.टी आरक्षण मिळावे. तसेच मेंढपाळ बांधवांवर वारंवार होणारे हल्ले यावरती महाराष्ट्र शासनाने कायद्यामध्ये काहीतरी तरतूद करून बांधवांना संरक्षण मिळण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा. यासाठी फलटण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 29 जुलै 2014 या दिवशी बारामती मध्ये आंदोलन दरम्यान धनगर समाजाला आश्वासन दिले होते की महाराष्ट्रामध्ये आमचे सरकार आणा धनगर समाजाचा एस.टी आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडवला जाईल. पण कित्येक वर्ष झाले पण धनगर समाजाचा आरक्षणाचं घोंगडं भिजतच राहिलं आणि ती आठवण करून देण्यासाठी सकल धनगर समाज फलटण तालुका व मेंढपाळ आर्मी संघटना यांच्या वतीने 29 जुलै 2026 रोजी बारा वर्षे पुर्ण होत आहेत याची जाणीव करून देण्यासाठी आज आठवण करून दिली.आरक्षणाचा प्रश्न अजुन काय मार्गी लागला नाही त्यामुळे सरकारला विनंती करण्यासाठी फलटण चे तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव यांना निवेदन देऊन सरकारपर्यंत आमची मागणी पोचवा अशी फलटण तालुक्यातील सकल धनगर समाज आणि मेंढपाळ आर्मी संघटना महाराष्ट्र यांच्यावतीने मागणी करण्यात आली तसेच मेंढपाळावरती वारंवार होणारे हल्ले व इतर सर्व गोष्टी चा सरकारने मार्ग काढावा मेंढपाळचा चाऱ्याचा मार्गी लावावा. तसेच फॉरेस्ट जागा चरण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली त्यावेळी फलटण तालुक्यातील उपस्थित समाज बांधव उपस्थित होते , युवा नेते निवृत्ती खताळ (सर) , श्री.तानाजी जगताप , युवा नेते नितीन सुळ , जेष्ठ मार्गदर्शक कालिदास चोरमले , श्री.नानासो गोवेकर मा.सरपंच श्री.आप्पा तात्या लोखंडे , प्रेम मोरे बहुजन पक्ष फलटण तालूका अध्यक्ष ह्.भ.प.हरी महाराज गोपनर (मेंढपाळ आर्मी प्रवक्ते) , श्री.शंकर शिंगाडे , श्री.रमेशभाऊ तांबे (मेंढपाळ आर्मी जिल्हाध्यक्ष) , जेष्ठ मार्गदर्शक किसनराव सोनवलकर (आबा) , श्री.रत्नाकर क्षीरसागर , श्री.प्रमोद शिंदे राष्ट्रीय मानव अधिकार व बाल संरक्षण परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष , श्री.गणेश कुंभार , श्री.सुरेश झेंडे , सामाजिक कार्यकर्ते शंभूराजे शेंडगे , श्री.महादेव शेळके (आबा) (मेंढपाळ आर्मी खंडाळा तालुकाध्यक्ष) , श्री.सुनील शिंदे (शाखाध्यक्ष हिंगणगाव) , श्री.रोहिदास ठोंबरे (संपर्क प्रमुख) , श्री.सचिन ठोंबरे , श्री.संतोष येळे , श्री.पोपट सुळ , श्री.बाबू तांबे , श्री.मुगटराव येळे , श्री.संतोश सुळ , इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment