डॉ. जयंत नारळीकर पुरस्कार डॉ. वसंत वाघ यांना प्रदान करण्यात मनस्वी आनंद झाला. कृष्णकुमार गोयल यांचे प्रतिपादन.
डॉ. जयंत नारळीकर पुरस्कार डॉ. वसंत वाघ यांना प्रदान करण्यात मनस्वी आनंद झाला. कृष्णकुमार गोयल यांचे प्रतिपादन.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाचा पुरस्कार फर्ग्युसन कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. वसंत वाघ यांना प्रदान करत असताना आपल्याला मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले. मूळचे पुसेगाव ता. खटाव येथील सुपुत्र आणि फर्ग्युसन कॉलेजचे माजी प्राचार्य वसंतराव वाघ यांना संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. मेधा कुलकर्णी , वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.के. सिन्हा, डॉ. संजय चाकणे, डॉ. प्रसाद खंडागळे, प्राचार्य उद्धवराव घाडगे, उत्तम कुमार इंदोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना डॉ. वसंत वाघ यांनी आपल्या जीवनाची झालेली यशस्वी वाटचाल केवळ शिक्षण आणि ज्ञान यावर आधारित असल्याचे सांगितले. सदर प्रसंगी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनिता राजे पवार यांनी वसंत वाघ हे व्यक्तिमत्व सामान्य कुटुंबातून अतिउच्च पदापर्यंत पोहोचल्याचा आम्हा कुटुंबीयांना अभिमान असल्याचे सांगितले. सदर प्रसंगी निवृत्त उपायुक्त के.एस. पवार, लेखक दिनेश फडतरे, नितीन जाधव, रमेश फडतरे, अविनाश फडतरे, प्रा. कैलास काटकर, बाबुराव साळुंखे, ज्ञानदेव साळुंखे, माधुरी जयदीप ननावरे, सागर फडतरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment