श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सन्मान.

श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सन्मान.

फलटण प्रतिनिधी:जुबेरभाई कोतवाल.

फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत निर्मला देवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण या शाळेतील विद्यार्थी  अर्णव किरण बनकर हा इयत्ता पाचवी महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा जिल्ह्यात 41 वा क्रमांक पटकावून मानकरी ठरला आहे. या विद्यार्थ्यांना 300 पैकी 256 गुण मिळाले आहेत त्याचबरोबर या शाळेतील डायमंड सर्च परीक्षा म्हणजेच इसरो अंतराळ प्रदर्शन भेट बेंगलोर या ठिकाणी भेटीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी कुमारी परिणीती प्रतिक भोसले इयत्ता तिसरी व कुमारी स्वरा अजय पाटील इयत्ता चौथी यांचाही गुणगौरव फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी माननीय श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर व मुख्याध्यापिका सौ. वैशाली जाधव मॅडम यांनी केले यावेळी पालकांचे व शिक्षकांचेही अभिनंदन करण्यात आले त्याचबरोबर शाळेच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल मुख्याध्यापक सौ. जाधव मॅडम यांचेही कौतुक करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.