ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन राज्याच्या राजकारणातील अभ्यासू नेतृत्व हरपलेग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
राज्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे (वय ९३) यांचे काल गुरुवारी (ता. ४) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी आज भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या मैदानावरती जेष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि ग्रामीण विकासाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निधनाने राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.भोर मतदारसंघाचे सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी जनतेचा प्रचंड विश्वास संपादन केला होता. ग्रामीण भागातील विकास, शेती, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने काम केले. मंत्रीपदाच्या कार्यकाळातही त्यांनी विकासकामांना प्राधान्य देत प्रशासन आणि जनतेतील दुवा म्हणून प्रभावी भूमिका बजावली.
साधी राहणी, लोकसंग्रह आणि जनसेवेची मूल्ये जपणारे नेतृत्व म्हणून अनंतराव थोपटे यांची ओळख होती. राजकारणात संयमी आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारे नेते म्हणून त्यांना विशेष मान होता. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली.त्यांच्या पश्चात कुटुंबीय, समर्थक आणि मोठा जनसंपर्क परिवार आहे. विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment