कचरा समस्या व रथमार्ग या प्रश्नासाठी सोमवारी रस्त्यावर उतरणार - युवानेत प्रताप जाधव.
कचरा समस्या व रथमार्ग या प्रश्नासाठी सोमवारी रस्त्यावर उतरणार - युवानेत प्रताप जाधव.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
गावची बांधिलकी म्हणून गट तट न पाहता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. सातारा जिल्ह्यात सुप्रसिद्ध श्री सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगाव नगरी विविध समस्याने ग्रासलेली आहे.गावातील प्रतिनिधींची उदासीनता व प्रशासनाचा भोंगळ कारभार कचऱ्याचे मोठे ढीग रस्त्याला पडले आहेत. रथ मार्गाचे रखडलेले काम,पाणी योजनेचा झालेला खेळ, व ग्रामपंचायत वर अजूनही नेमणूक न झालेला प्रशासक.या गोष्टीमुळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून येणाऱ्या सोमवारी रस्त्यावर उतरणार आहेत. प्लास्टिक मुक्त पुसेगाव, स्वच्छ सुंदर पुसेगाव, फसवी जाहिरातबाजी, कर वसुलीसाठी लावलेला तगादा, सुविधा वंचित असलेले ग्रामस्थ असल्या खोट्या आश्वासनापेक्षा प्रशासनाने गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून दोन ते तीन महिने झालं कचरा प्रश्न मिटलेला नाही. रस्त्याच्या चारी रोडला कचऱ्याचे मोठ ढीग पडलेले आहेत, धुराचे लोट कायम चालू आहेत, मागील महिन्यात अशीच एक महिला कचरा टाकण्यासाठी गेली असतात तिचा अपघाती मृत्यू झाला यास जबाबदार कोण ? संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा रथ मार्गाचे काम पूर्ण रखडलेले आहे. मोठे खड्डे काढून रथ मार्गाचे काम प्रलंबित पडले आहे. पिण्याच्या पाण्याचेही काम बे भरोशाचे आहे. या सर्व विषयावर ग्रामस्थ आक्रमक असून गट तट न पाहता निवडणुका येतील जातील परंतु गावचा स्वाभिमान व विकासाचा पर्व अबाधित चालू राहवे यासाठी सोमवारी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित रहा असे आवाहन प्रताप जाधव यांनी केले आहे या प्रशासनबाबत गट विकास अधिकारी श्री कदम साहेब बी डी ओ याच्या उपस्थित मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे संबंधित सर्व विभागांना संबंधित निवेदनाच्या प्रती देण्यात आले आहेत तरी प्रशासनाने याची दखल गभिर्याने घ्यावी.
Comments
Post a Comment