फलटण : आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा.

फलटण : आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा.

फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल.

२०२६ निमित्त फलटण तालुक्यातील पाहणी दौरा आणि संबंधित मान्यवरांसोबत बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, पालखी सोहळ्याच्या नियोजनाला गती देण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.दिनांक २५ मार्च २०२६ (बुधवार) रोजी सकाळी ११ वाजल्यापासून हा दौरा सुरू होणार असून फलटण तालुक्यातील विविध ठिकाणी पाहणी आणि बैठका पार पडणार आहेत.सकाळी ९.०० ते ९.३० – सासवड नगरपालिकेत बैठक
सकाळी १०.०० ते १०.३० – जेजुरी नगरपालिकेत बैठक
सकाळी ११.०० ते ११.३० – वाल्हे ग्रामपंचायत
दुपारी १२.०० ते १२.३० – लोणंद ग्रामपंचायत
दुपारी १.०० ते १.३० – तरडगाव ग्रामपंचायत
दुपारी २.०० ते २.३० – फलटण येथे प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय येथे बैठक
दुपारी ३.३० ते ४.०० – नातेपुते
दुपारी ४.३० ते ५.०० – माळशिरस
सायंकाळी ६.०० ते ६.३० – वेळापूर
सायंकाळी ६.४५ ते ७.०० – शेवटचा टप्पा (पंढरपूरकडे प्रयाण)
या पाहणी दौऱ्यात पालखी मार्गावरील व्यवस्था, मुक्काम स्थळे, पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधांबाबत आढावा घेण्यात येणार आहे.
संबंधित विभागांचे अधिकारी, स्थानिक प्रशासन तसेच मान्यवर यांच्यासोबत चर्चा करून पालखी सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याने प्रशासन, स्थानिक संस्था आणि नागरिक यांच्यात समन्वय साधून नियोजन करणे आवश्यक असल्याचे संस्थान कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.