फलटण मध्ये भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटणमध्ये 31 मार्च 2026 भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान महावीर यांच्या कार्याबद्दल सांगायची झाली तर भगवान महावीर एक जैन समाजाचे 24 वे अंतिम तीर्थकार असून त्यांनी हिंसा सत्य अपरिग्रहाचे प्रणित होते. ख्रिस्तपूर्वी 599 मध्ये बिहार मधील कुंडलपूर येथील राजा सिद्धार्थ व माता त्रिशला यांच्या पोटी जन्मलेल्या भगवान महावीर तिसाव्या वर्षी राजवैभव चा त्याग करून तपस्या केली. त्यांनी जगाला जागा आणि जगू द्या अहिंसाची शिकवण दिली. महावीर यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने वाद्य ढोल ताशा लेझीम देखावे ठेवण्यात आली होती. यावेळी जैन समाजाच्या महिला पुरुष फलटणमधील नागरिक त्याचबरोबर रणरागिनी बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने भगवान महावीर जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रजिया इस्माईल शेख उपाध्यक्ष अतुल माणिक लाल शहा. मारुती बाळासाहेब टकले. इम्रान सिकंदर सय्यद. संचलिका सौ. नीना राजेंद्र कोठारी. सौ. मनीषा चेतन घडिया. सौ. प्रीती अतुल शहा. हिना इम्रान सय्यद इतर संचालिका यावेळेस उपस्थित भगवान महावीर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
Comments
Post a Comment