महिला गृह उद्योजक विक्री केंद्रामुळे महिला सक्षम होतील समाजसेविका वनिताताई भंडारे
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
जागतिक महिला दिना दिवशी आदर्श महिला ग्रुप यांनी देगाव, रोड अमर लक्ष्मी चौक सातारा येथे महिला गृह उद्योग विक्री केंद्र सुरू करून ८ मार्च महिला दिन सावित्रीबाई फुले यांच्या प्रति मेस पूजन करून केक कापून महिला दिन साजरा केला
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व महिलांना हाताला काम मिळण्यासाठी तसेच सर्वसामान्य गरजू महिलांनी निर्माण केलेल्या उत्पादीत बाजारपेठ देण्याच्या उद्देशाने व महिला बचत गट व्यवसायाच्या मार्केटिंगची या अनुसंगाने महिला गृह उद्योग विक्री केंद्र ८ मार्च महिला दिनाच्या दिवशी उद्घाटन करून८मार्च महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळेस उद्घाटन करताना आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष सौ.वनिता ताई भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी बोलताना महिला गृह उद्योग विक्री केंद्र यामुळे सक्षम व त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल व त्यांनी केलेल्या उत्पादनाला योग्यतो बाजार भाव भेटेल असे त्या म्हणाल्या
यावेळी या कार्यक्रमास
रणरागिनी महिला बचत गट सचिव मोनिका सुतार, मोनाली बर्गे, पुनम जाधव, प्रणाली करपे, नीलम हावळे, धनश्री धुमाळ,वैशाली माळी, कल्पना चाळके, वैशाली वाटकर,सीमा बर्गे, सुषमा सुकंडे, कल्पना जाधव, धनश्री बागडे, अनिता भवर, गीता मुंडे, भाग्यश्री माळी, सुषमा शिंदे, व इतर सामाजिक क्षेत्रातील महिला, डॉक्टर, शिक्षिका, जेष्ठ महिला,विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment